Hinjewadi Metro : पुणेकरांची प्रतीक्षा लांबली! डेडलाईन हुकली पण मेट्रो धावणार; 'हा' नवा प्लॅन आला समोर

Published : Dec 27, 2025, 03:45 PM ISTUpdated : Dec 27, 2025, 03:53 PM IST

Hinjewadi Metro : पुणे-हिंजवडी मेट्रो लाईन ३ ची डिसेंबर २०२५ ची डेडलाईन हुकली असून, आता मार्च २०२६ पर्यंत मुदतवाढ मिळाली. ११ स्थानकांचे काम अपूर्ण असले तरी प्रशासनाने मुख्य मार्गावर काही स्थानकांसह मेट्रो लवकर सुरू करण्यासाठी 'प्लॅन बी' तयार केला. 

PREV
16
पुणेकरांची प्रतीक्षा लांबली! डेडलाईन हुकली पण मेट्रो धावणार

पुणे/पिंपरी: आयटी हब हिंजवडीला पुण्याशी जोडणाऱ्या 'मेट्रो लाईन ३' बाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली डिसेंबर २०२५ ची डेडलाईन आता हुकली असून, हा प्रकल्प पुन्हा एकदा विलंबाच्या फेऱ्यात अडकला आहे. मात्र, पुणेकरांना जास्त वाट पाहायला लागू नये म्हणून प्रशासन आता एका 'बदली' प्लॅनवर विचार करत आहे. 

26
नेमकी अडचण काय? (११ स्थानकांचे काम रखडले)

माण–हिंजवडी ते शिवाजीनगर या २३.३ किमीच्या मार्गावर एकूण २३ स्थानके आहेत. मात्र, त्यापैकी ११ स्थानकांचे काम अजूनही अपूर्ण आहे. तिथे सरकते जिने, पार्किंग आणि प्रवाशांसाठीच्या मूलभूत सुविधा अद्याप तयार नाहीत. एकूण प्रकल्पाचे सुमारे ९ टक्के काम अद्याप बाकी आहे. 

36
प्रशासनाचा 'प्लॅन बी': अपूर्ण स्थानके वगळून मेट्रो सुरू होणार?

प्रकल्प पूर्ण व्हायला वेळ लागत असला तरी, मुख्य मार्गिका आणि रुळांचे काम पूर्ण झाले आहे. इतकेच नाही तर मेट्रोचे दोन ट्रेनसेट पुण्यात दाखल झाले असून त्यांच्या चाचण्याही यशस्वी झाल्या आहेत. त्यामुळे आता अपूर्ण काम असलेली स्थानके वगळून, उर्वरित स्थानकांवर मेट्रो सुरू करण्याचा विचार प्रशासन करत आहे. जेणेकरून आयटी कर्मचाऱ्यांची वाहतूक कोंडीतून सुटका होईल. 

46
मुदतवाढ आणि नवीन डेडलाईन

जुनी मुदत: डिसेंबर २०२५

नवी मुदत: ३१ मार्च २०२६ (प्रकल्पाला ५४३ दिवसांची मुदतवाढ)

कारण: भूसंपादनातील अडथळे, परवानग्यांचा विलंब आणि जागेचा ताबा मिळण्यास झालेली उशीर. 

56
प्रकल्पावर एक नजर

एकूण खर्च: ८,३१२ कोटी रुपये (पीपीपी मॉडेल).

कामाची सुरुवात: २५ नोव्हेंबर २०२१.

सध्याची स्थिती: पीएमआरडीए आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी कामाचा आढावा घेऊन 'टाईम लाईन' पाळण्याचे कडक निर्देश दिले आहेत. 

66
हिंजवडीतील ट्रॅफिकला कंटाळलेल्या चाकरमान्यांसाठी महत्वाची माहिती

थोडक्यात काय? हिंजवडीतील ट्रॅफिकला कंटाळलेल्या चाकरमान्यांसाठी ही बातमी संमिश्र आहे. मेट्रो पूर्ण क्षमतेने सुरू होण्यास मार्च २०२६ उजाडणार असला, तरी काही निवडक स्थानकांवरून मेट्रो लवकरच धावताना दिसू शकते.

RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...
Read more Photos on

Recommended Stories