
पुणे : पुणेकरांसाठी एक अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे. शहरात आयोजित करण्यात आलेल्या 'राष्ट्रीय सायकल स्पर्धे'मुळे (National Cycling Race) सोमवारी, १९ जानेवारी रोजी मध्यवर्ती भागातील वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत. उद्या सकाळपासून सायंकाळपर्यंत शहरातील सर्वात गजबजलेले रस्ते वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद राहणार आहेत.
सायकल स्पर्धेतील ‘प्रोलॉग रेस’ निमित्त सकाळी ९:०० ते सायंकाळी ६:०० या वेळेत खालील प्रमुख मार्ग बंद असतील.
जंगली महाराज रस्ता (JM Road)
फर्ग्युसन कॉलेज रस्ता (FC Road)
गणेशखिंड रस्ता
या मुख्य रस्त्यांना जोडणारे सर्व उपरस्ते आणि गल्ल्या.
वाहतूक कोंडीचा फटका विद्यार्थ्यांना बसू नये, यासाठी प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून एफ.सी. रोड, जे.एम. रोड आणि गणेशखिंड परिसरातील अनेक शाळा आणि महाविद्यालयांना सोमवारी सुट्टी जाहीर केली आहे. पालकांनी या बदलाची नोंद घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
वाहतूक पोलिसांनी नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी खालील पर्यायी मार्गांचा वापर करण्यास सुचवले आहे. १. जहांगीर चौक ते आरटीओ रस्ता २. बोलई चौक ३. मालधक्का चौक
"शक्य असल्यास उद्या खासगी वाहनांचा वापर टाळावा. केवळ अत्यावश्यक कामासाठीच घराबाहेर पडावे आणि प्रवासाचे नियोजन आधीच करून ठेवावे, जेणेकरून सायकल स्पर्धेमुळे होणारी गैरसोय टाळता येईल."