Pune Gas Cylinder New Rules: पुणेकरांनो सावधान! गॅस सिलिंडर हवाय? मग 'हे' काम तातडीने करा, अन्यथा पुरवठा होणार बंद; पहा नवे नियम

Published : Mar 09, 2026, 04:43 PM IST

Pune Gas Cylinder New Rules: पुणे जिल्ह्यातील गॅस ग्राहकांना आता सिलिंडर बुकिंगसाठी केवायसी अपडेट करणे बंधनकारक आहे, अन्यथा त्यांचे बुकिंग ब्लॉक केले जाईल. यासोबतच, दोन सिलिंडर बुकिंगमधील अंतर २१ दिवसांवरून ३० दिवसांपर्यंत वाढवण्यात आले आहे. 

PREV
15
पुणेकरांनो सावधान! गॅस सिलिंडर हवाय? मग 'हे' काम तातडीने करा

पुणे: जर तुम्ही अद्याप तुमच्या गॅस कनेक्शनचे KYC (केवायसी) अपडेट केले नसेल, तर सावधान! पुणे जिल्ह्यातील गॅस ग्राहकांसाठी कंपन्यांनी कडक पाऊल उचलले असून, केवायसी प्रक्रिया पूर्ण नसलेल्या ग्राहकांचे गॅस बुकिंग आता थेट ब्लॉक केले जाणार आहे. केवळ केवायसीच नाही, तर सिलिंडर बुकिंगच्या कालावधीतही मोठा बदल करण्यात आला आहे.

25
१. केवायसी नसेल तर बुकिंग नाही!

गॅस कंपन्यांच्या निर्णयानुसार, ज्या ग्राहकांची केवायसी प्रक्रिया अपूर्ण आहे, त्यांचा सिलिंडर पुरवठा तातडीने थांबवण्यात येत आहे. आता ऑनलाइन बुकिंग करताना केवायसीची विचारणा केली जात असून, ही प्रक्रिया पूर्ण असल्याशिवाय तुमचे बुकिंग स्वीकारले जाणार नाही. त्यामुळे ऐनवेळी गॅस संपल्यावर होणारी धावपळ टाळण्यासाठी आजच तुमच्या वितरकाकडे धाव घ्या.

35
२. आता ३० दिवसांनंतरच मिळणार दुसरा सिलिंडर

घरगुती गॅस वितरणात आणखी एक मोठा बदल करण्यात आला आहे. दोन सिलिंडर बुक करण्यामधील किमान कालावधी जो आधी २१ दिवस होता, तो आता वाढवून थेट ३० दिवस करण्यात आला आहे. म्हणजेच, एकदा सिलिंडर घेतल्यावर तुम्हाला पुढच्या बुकिंगसाठी महिनाभर वाट पाहावी लागणार आहे. या ८ दिवसांच्या वाढीव 'वेटिंग पिरीयड'मुळे गृहिणींचे बजेट आणि नियोजन कोलमडण्याची शक्यता आहे. 

45
३. आंतरराष्ट्रीय युद्धाचा पुरवठ्यावर परिणाम

जागतिक स्तरावर सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे इंधन पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे. कच्च्या तेलाच्या किमतीतील चढ-उतार आणि एलपीजीच्या मर्यादित उपलब्धतेमुळे हा निर्णय घ्यावा लागल्याचे समजते. पुरवठ्यावर आलेला ताण पाहता, गॅसचा वापर अत्यंत काटकसरीने करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. 

55
ग्राहकांनी काय करावे?

तातडीने केवायसी करा: आधार कार्ड आणि बँक पासबुकसह जवळच्या गॅस एजन्सीला भेट द्या.

वापरावर नियंत्रण: ३० दिवसांच्या नियमामुळे गॅस जपून वापरा.

ऑनलाइन स्टेटस तपासा: तुमच्या गॅस कंपनीच्या ॲपवर केवायसी स्टेटस 'Active' आहे की नाही, याची खात्री करा. 

Maharashtra News (महाराष्ट्र बातम्या): Read Maharashtra LIVE Updates and Latest Marathi News Today. Check महाराष्ट्र राजकीय बातम्या, महाराष्ट्र क्राईम न्यूज, महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज. Watch Maharashtra Viral News Videos, Photos, Maharashtra Weather Updates in Marathi at Asianet Marathi News.
RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...
Read more Photos on

Recommended Stories