नीट पेपर फुटी प्रकरणात मोठी अपडेट, 5 लाखांमध्ये नीटच्या केमिस्ट्रीचा पेपर फोडल्याचा दावा

Published : Jul 16, 2026, 11:33 AM IST
NEET 2026

सार

NEET 2026 पेपरफुटी प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. याशिवाय या प्रकरणात शिवराज मोटेगावकर यांच्याविरोधात CBIने काही गंभीर आरोप केले आहेत.

मुंबई : नीट (NEET 2026) पेपरफुटी प्रकरणात आता धक्कादायक खुलासा झाला आहे. याबद्दल सीबीआयने लातूरमधील कोचिंग क्लास संचालक शिवराज मोटेगावर यांच्यावर काही आरोप केले आहेत. सीबीआयनुसार, शिवराज मोटेगावकर यांनी परीक्षेपूर्वी केमिस्ट्रीचे प्रश्न मिळवल्याचा दावा केला आहे. यासाठी लाखो रुपये दिल्याचेही बोलले जात आहे.

 5 लाखांत मिळाले केमिस्ट्रीचे प्रश्न?

CBIच्या तपासानुसार, शिवराज मोटेगावकर यांनी सहआरोपींसोबत नीट युजी 2026 (NEET (UG) 2026) परीक्षेपूर्वी केमिस्ट्रीचे प्रश्न मिळवले. हे प्रश्न एनटीएच्या (NTA) प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्या समितीतील सदस्य पी. व्ही. कुलकर्णी यांच्याकडून मिळाल्याचा आरोप आहे. त्यासाठी 5 लाख रुपयांची रक्कम देण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. 

मोटेगावरच्या मोबाइमध्ये सापडले केमिस्ट्रीचे 111 प्रश्न

CBIने जप्त केलेल्या मोटेगावकर यांच्या मोबाईल फोनमध्ये 36 फोटो सापडले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, यापैकी 111 प्रश्न NEET 2026 च्या मास्टर प्रश्नांसोबत जुळत असल्याचा दावा सीबीआयने केला आहे. हे फोटो परीक्षेच्या जवळपास 10 दिवस आधी घेतल्याचे मेटाडेटा विश्लेषणातून समोर आले आहे.

बँक खाती आणि लॉकरांचीही चौकशी

पेपरफुटी प्रकरणात आर्थिक व्यवहारांचे धागेदोरेही समोर येत आहेत. त्यामुळे सीबीआयने आता शिवराज मोटेगावकर आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या बँक खात्यांसह लॉकरांची तपासणी सुरू केली आहे. याशिवाय संभाव्य आर्थिक गैरव्यवहारांशी संबंधित कागदपत्रे, डिजिटल पुरावे आणि मालमत्तेची माहिती शोधण्याचेही काम सुरू आहे.

कोण आहेत शिवराज मोटेगावकर?

शिवराज मोटेगावकर लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातील एका सामान्य शेतकरी कुटुंबातील आहेत. शिवराज मोटेगावकर यांनी संघर्षातून शिक्षण पूर्ण केले. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातून एम.एस्सी. (केमिस्ट्री) पदवी घेतली. तसेच मोटेगावकर यांनी घरगुती शिकवणीपासून करियरची सुरुवात केली. पुढे त्यांनी उभारलेल्या कोचिंग संस्थेने मोठी झेप घेतली. आज त्या कोचिंग क्लासेसची वार्षिक उलाढाल 100 कोटी रुपयांच्या आसपास असल्याची चर्चा आहे.

PREV
Maharashtra News (महाराष्ट्र बातम्या): Read Maharashtra LIVE Updates and Latest Marathi News Today. Check महाराष्ट्र राजकीय बातम्या, महाराष्ट्र क्राईम न्यूज, महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज. Watch Maharashtra Viral News Videos, Photos, Maharashtra Weather Updates in Marathi at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

Maharashtra Drought : महाराष्ट्रात भीषण दुष्काळ; मदतीसाठी सरकारची तयारी सुरू
Old Monk FSSAI Dispute : 'ओल्ड मंक'ला आता 'रम' म्हणता येणार नाही? FSSAI च्या अटीमुळे कंपनीला 500 कोटींचा फटका