पुण्यात 1 ऑगस्टला वाहतूक बदल, अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त महत्त्वाचे रस्ते बंद, पर्यायी मार्गांची माहिती वाचा

Published : Aug 01, 2025, 01:18 PM IST
traffic

सार

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त पुण्यात 1 ऑगस्ट 2025 रोजी शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले आहेत. याबद्दलच सविस्तर जाणून घेऊया.

मुंबई : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त पुण्यात 1 ऑगस्ट 2025 रोजी शहरातील वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल करण्यात आले आहेत. यानुसार काही मुख्य रस्ते काही काळासाठी बंद राहणार असून वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक विभागाने केले आहे.

मिरवणुका आणि वाहतूक बदलाची वेळ:

पुणे शहरातील विविध संस्था आणि पक्षांच्या वतीने अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यासाठी सारसबाग परिसरात मिरवणुका निघणार आहेत. त्यामुळे सकाळी ७ वाजल्यापासून वाहतूक बंदोबस्त लागू केला जाईल.

वाहतूक बदलाचा परिणाम:

  • जेधे चौक ते सारसबागदरम्यानचा बालाजी विश्वनाथ पथ वाहतुकीसाठी बंद राहणार.
  • सिंहगड रोडकडून स्वारगेटकडे जाणारी वाहतूक दांडेकर पुल > नाथ पै चौक > ना.सी. फडके चौक > पुरम चौक > टिळक रोड > जेधे चौक या मार्गे वळवण्यात येईल.
  • सावरकर चौक ते पुरम चौकदरम्यानची वाहतूक पूर्णतः बंद राहणार.
  • दांडेकर पुल ते सावरकर चौक जाणारी वाहतूक बंद.
  • दांडेकर पुल आणि सावरकर चौक येथे वाहतूक दुपारी ३ ते रात्री १२ वाजेपर्यंत दुहेरी मार्गाने सुरु राहणार.
  • निलायम ब्रिजवरून सावरकर चौकाकडे जाणारी वाहने पर्वती गाव मार्गे वळवली जातील.

पर्यायी मार्ग:

जेधे चौक > सातारा रोड > व्होल्गा चौक > मित्रमंडळ चौक > सावरकर चौक

नाथ पै चौक > सावरकर चौक > दांडेकर पुल > ना.सी. फडके चौक > कल्पना हॉटेल > टिळक रोड > पुरम चौक

या मार्गावरील बदल अग्निशमन, पोलीस, रुग्णवाहिका अशा अत्यावश्यक सेवांना लागू होणार नाहीत. नागरिकांनी वेळेत प्रवासाचे नियोजन करून वाहतूक पोलिसांच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे, असे आवाहन वाहतूक उप-आयुक्त हिंमत जाधव यांनी केले आहे.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

शासनाचा ऐतिहासिक निर्णय! शेतजमिनीचे वाद मिटणार, ‘सलोखा योजना’ला 2027 पर्यंत मुदतवाढ
मुंबईत ठाकरे गटाचा महापौर होणार? देवेंद्र फडणवीसांची उद्धव ठाकरेंशी चर्चा, एकनाथ शिंदेंना शह