'Pro Govinda'च्या माध्यमातून गोविंदा खेळ जगभरात पोहोचला- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Pro Govinda 2024 : 'प्रो गोविंदा'च्या माध्यमातून गोविंदा खेळ जगभरात पोहचल्याचा आनंद  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे. यंदा श्रीकृष्णाजन्माष्टमीचा सण 26 ऑगस्टला असून दही हंडी 27 ऑगस्टला असणार आहे. 

Chanda Mandavkar | Published : Aug 19, 2024 6:16 AM IST / Updated: Aug 19 2024, 11:47 AM IST
16
प्रो-गोविंदा लीग 2024

मुंबईतील दहीहंडी उत्सवाला खेळाला जागतिक स्वरूप मिळवून देणाऱ्या प्रो-गोविंदा लीगचा बक्षीस वितरण सोहळा नुकताच वरळी येथील एन.एस.सी.आय.डोममध्ये पार पडला. यावेळी या लीगमध्ये सहभागी झालेल्या गोविंदांसोबत संवाद साधत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुभेच्छा दिल्या. 

26
प्रो-गोविंदा लीक पुरस्कार सोहळा

पुरस्कार वितरणावेळी खासदार डॉ.श्रीकांत शिंदे, खासदार मिलिंद देवरा, आमदार प्रताप सरनाईक, मोहम्मद दुराणी, पुर्वेश सरनाईक आणि प्रो- गोविंदा स्पर्धेचे आयोजक, संघ मालक आणि गोविंदा पथकातील गोविंदा उपस्थित होते.

36
अपघातमुक्त गोविंदा साजरा करूयात- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

खेळामध्ये स्पर्धा असली पाहिजे, पण ती जीवघेणी नसावी. त्यामुळे यंदा आपण सर्वांनी अपघातमुक्त गोविंदा उत्सव साजरा करूया असे आवाहन करून मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी गोविंदा पथकांना केले.खरंतर, दही हंडीचा खेळ स्वातंत्र्यपूर्व काळापासून हा खेळ सुरू आहे. या खेळाचा समावेश साहसी क्रीडा प्रकारामध्ये करण्यात आला आहे.

46
गोविंदांच्या विमा संरक्षाची शासनावर जबाबदारी

 गोविंदांच्या विमा संरक्षणाची जबाबदारी शासनाने घेतली आहे असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले. यंदाच्या वर्षी 75 हजार गोविंदांचा विमा उतरविण्यात आला असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. गतवर्षीप्रमाणे यंदाही 60 गोविंदांना स्पेनला पाठवतो आहोत असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा केली. 

56
सातारा सिंघम संघाचा विजय

यंदा प्रो- गोविंदा लीगमध्ये एकूण 32 संघ सहभागी झाले होते. त्यापैकी 16 संघांनी अंतिम फेरीत आपले कौशल्य सादर केले. सातारा सिंघम या संघाने प्रथम क्रमांक पटकावला. विजेत्या संघाचे अभिनंदन करून त्यांना सन्मानित केले. 

66
गोविंदा पथकांना अधिक सराव करण्याचे मुख्यमंत्र्यांकडून आवाहन

प्रो-गोविंदा लीगमध्ये अपयशी संघांनी हार न मानता पुढच्या वर्षी अधिक सराव करून पुन्हा मैदानात उतरावे असेही आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गोविंदांना केले. 

आणखी वाचा : 

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक डिसेंबरमध्ये?, 'लाडकी बहीण' ठरणार कारण?

गणेशोत्सवात डीजे आणि लेझर लाईट वापरावर मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

Share this Photo Gallery
Recommended Photos