
केंद्र सरकारच्या पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत २० वा हप्ता २ ऑगस्ट २०२५ रोजी जारी केला जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसी येथून शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा केले आहेत आणि तो शेतकऱ्यांच्या आधार लिंक केलेल्या बँक खात्यात बँकेतून ट्रान्सफर प्रणालीद्वारे २,०००रुपये जमा करण्यात येईल
या २० व्या हप्त्यात सुमारे ९.३ कोटी शेतकऱ्यांना लाभ होणार असून, एकूण ₹२०,५०० कोटी रक्कम त्यांच्या खात्यांमध्ये ट्रान्सफर केली जाईल. यापूर्वीच्या १९ हप्त्यांमध्ये सुमारे ₹३.९० लाख कोटींचे वितरण झाले आहे
शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे दुपारी ११ वाजण्याच्या आसपास जमा झाले आहेत. अधिकृत संकेतस्थळावर “Beneficiary Status” तपासून कोणाची यादीमध्ये समाविष्ट झाली आहे का हे सहज तपासता येऊ शकते. योजना अंतर्गत लाभ मिळवण्यासाठी इ केवायसी पूर्ण, आधार आणि बँक खाते लिंक असणे, जमिनीची नोंदणी आणि DBT मोड सुरु असणे हे अत्यावश्यक आहे. या अटींमुळेच 2,000 रुपये मिळतात, अन्यथा लाभ मिळणार नाही असं शेतकऱ्यांना सांगण्यात आलं आहे.
शेतकऱ्यांनी कोणत्याही फेक कॉल, मेसेज किंवा सोशल मीडियावरील अफवांपासून सावध राहावे असे सरकारने सांगितले आहे. फक्त पीएम किसान अधिकृत संकेतस्थळावरूनच माहिती घ्या आणि कोणतीही शंका असल्यास हेल्पलाइन क्रमांकांवर संपर्क साधा.