Pune Porsche Accident : पोर्शे कार अपघातातील आरोपी अग्रवाल कुटुंबाचे छोटा राजनशी संबंध, अजय भोसले यांनी केली टीका

पुणे येथील कार अपघातातील आरोपीच्या कुटुंबियांचे अंडरवर्ल्डशी संबंध असल्याची माहिती समजली आहे. या पुणे येथील माजी नगरसेवक अजय भोसले यांनी हे आरोप केले आहेत. 

पुणे येथे शनिवारी रात्री झालेल्या अपघातात दोन आयटीमधील अभियंत्यांचा मृत्यू झाला. यावेळी अल्पवयीन आरोपीला अटक झाल्यानंतर दहा तासांनी त्याची सुटका करण्यात आली. त्यानंतर स्थानिक लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी दबाव आणल्यामुळे आरोपीच्या वडिलांना अटक करण्यात आली आहे. त्यांना अटक केल्यानंतर अनेक नवीन खुलासे समोर येत आहेत. 

अजय भोसले यांच्या हत्येची दिली होती सुपारी - 
पुणे शहरातील स्थानिक नेते अजय भोसले यांनी आरोपींच्या आजोबानी मला मारायची सुपारी छोटा राजनला दिली होती, असे म्हटले होते. भोसले यांच्यावर आरोप करण्यासाठी छोटा राजांच्या नेमबाजांना नेमण्यात आले होते. छोटा राजन हा या प्रकरणातील प्रमुख आरोपी असून हे प्रकरण सध्या सीबीआयच्या चौकशीत अडकले असल्याचे म्हटले आहे. 

अजय भोसले यांच्या गादीवर झाडण्यात आल्या होत्या गोळ्या - 
11 नोव्हेंबर 2009 रोजी अजय भोसले यांच्यावर कोरेगाव पार्क प्रचारासाठी जात असताना त्यांच्या गाडीवर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. त्यावेळी त्यांच्या गाडीचा ड्रायव्हर जखमी झाला होता. हा वाद प्रामुख्याने राजकीय वाद आणि जामिनीचे वाद असल्याचे सांगण्यात आले आहे. या नवीन खुलाशामुळे अग्रवाल यांच्या कुटुंबियांचे काळे धंदे समोर येत आहेत. 

राहुल गांधी यांनी व्हिडीओ केला ट्विट - 
शनिवारी रात्री पुणे येथील कल्याणीनगर परिसरात झालेल्या अपघातामुळे संपूर्ण देश खवळून निघाला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी या प्रकरणावर व्हिडीओ बनवून पोस्ट केला आहे. या प्रकरणी अल्पवयीन प्रमुख आरोपीला जामीन मिळाला असला तरी त्याचे वडील विकास अग्रवाल, बार मालक आणि बार मॅनेजर या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे.
आणखी वाचा - 
पुणे पोर्शे हिट अँड रन प्रकरणातील कोसी आणि ब्लॅक हे दोन पब उत्पादन शुल्क विभागाने केले बंद, आरोपीवर होणार कठोर कारवाई
सरकारी कर्मचारी अडचणीत, 5 वर्षात 630 सुट्या, वर्षात फक्त 240 दिवस काम

Share this article