
Mumbai : मुंबईसह राज्यातील गणेशोत्सव मंडळांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. प्लास्टर ऑफ पॅरिस (POP) गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी फडणवीस सरकार नवीन धोरण आणण्याच्या तयारीत आहे. या आठवड्यात शासनाकडून मूर्ती विसर्जनासाठी नवे धोरण जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे लालबागचा राजा, मुंबईचा राजा यांसारख्या प्रतिष्ठित मंडळांसह अनेक गणेश मंडळांचे याकडे लक्ष लागले आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने नुकताच पीओपी मूर्तींवरील बंदी उठवण्याचा निर्णय दिला असून, मूर्तिकार आणि गणेश मंडळांमध्ये यामुळे आनंदाचे वातावरण आहे. याच पार्श्वभूमीवर सरकार मूर्ती विसर्जनासाठी नव्या धोरणावर काम करत आहे.
धोरणात कोणाला मिळणार दिलासा?
सूत्रांच्या माहितीनुसार, उंच POP मूर्तीची प्राणप्रतिष्ठा मंडळांना करता येणार असून, धोरणात लालबागचा राजा आणि मुंबईचा राजा यांसारख्या मंडळांना विशेष सवलती दिल्या जाणार आहेत.
न्यायालयाचे स्पष्ट निर्देश
मुंबई उच्च न्यायालयाने POP मूर्ती बनवण्यास आणि विक्रीस परवानगी दिली असली तरी, नैसर्गिक जलस्रोतांमध्ये त्यांचे विसर्जन करण्यास पूर्णतः मनाई केली आहे. अशा मूर्तींचे विसर्जन केवळ कृत्रिम तलावांमध्येच करावे लागेल. तसेच, सरकारने तीन आठवड्यांत एक समिती नेमून सविस्तर उपाययोजना सादर कराव्यात, असे निर्देशही कोर्टाने दिले आहेत.
काय घडलं न्यायालयात?
या निर्णयामुळे घरगुती गणपतीसाठी तसेच सार्वजनिक मंडळांसाठी POP मूर्ती बनवण्यास अडथळा उरलेला नाही. मात्र, पर्यावरणपूरक विसर्जनाच्या अटींवर कटाक्षाने पालन करणे बंधनकारक असेल. मूर्तिकारांसाठी ही मोठा दिलासा देणारी वेळ आहे.
(राहा अपडेट, राहा जगाच्या पुढे. सातत्याने अपडेट होणाऱ्या आमच्या फेसबुक आणि एक्स (ट्विटर) पेजला सबक्राईब करुन ताज्या घडामोडी जाणून घ्या.)
आमच्या एशियानेट न्यूज मराठीच्या फेसबुक पेजला सबस्क्राईब करा. त्यासाठी येथे क्लिक करा.
आमच्या एशियानेट न्यूज मराठीच्या एक्स (ट्विटर) पेजला सबस्क्राईब करा. त्यासाठी येथे क्लिक करा.