जळगावात मुख्यमंत्र्यांच्या सभेनंतर शिक्षकांना पैसे वाटप केल्याचे सुषमा अंधारेंनी केले ट्विट, शिंदेंच्या शिवसेनेने आरोप फेटाळला

Sushma Andhare on Eknath Shinde : जळगाव येथील मुख्यमंत्र्यांच्या सभेनंतर शिक्षकांना पैसे वाटप केल्याचा गंभीर आरोप ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केला आहे.

Rameshwar Gavhane | Published : Jun 23, 2024 7:42 AM IST

Sushma Andhare on Eknath Shinde : नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी 26 जुन रोजी मतदान पार पडणार आहे. प्रचाराच्या अंतिम टप्यात महायुती आणि महाविकास आघाडीने कंबर कसली असून शनिवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार किशोर दराडे यांच्यासाठी नाशिक, जळगाव, अहमदनगरमध्ये बैठका घेतल्या. मात्र जळगाव येथील मुख्यमंत्र्यांच्या सभेनंतर शिक्षकांना पैसे वाटप केल्याचा गंभीर आरोप ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केला आहे.

सुषमा अंधारे यांनी एक्स या सोशल मिडियावर माध्यमावर व्हिडिओ शेअर करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. पोस्टमध्ये म्हटले आहे की, महायुतीचे उमेदवार दराडे यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जळगावातील आदित्य लॉन्स येथे सभा झाली. सभेनंतर जिल्ह्यातील आलेले प्रत्येक शाळेचे शिक्षक, कर्मचारी, मुख्याध्यापक, संस्थाचालक यांना पैसे वाटप करण्यात आले. कुठे आहे निवडणूक आयोग?, असा आरोप त्यांनी केला आहे.

शिंदे गटाने आरोप फेटाळले

सुषमा अंधारे यांच्या आरोपाला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देखील दुजोरा दिला आहे. निवडणूक आयोग उघड्या डोळ्यांनी व्यभिचार पाहत आहे. निवडणूक आयोग धृतराष्ट्राप्रमाणे वागत असल्याचा हल्लाबोल त्यांनी केला आहे. तर दुसरीकडे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने सुषमा अंधारे यांचे आरोप फेटाळले आहेत.

 

Share this article