PMRDA Lottery 2025 : लॉटरी लागली! पुण्यात घर घेण्याचं स्वप्न पूर्ण होणार! PMRDA तर्फे सर्वात मोठी सोडत जाहीर, लगेच अर्ज करा!

Published : Dec 15, 2025, 05:51 PM IST

PMRDA Lottery 2025 : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने PMRDA अत्यल्प EWS, अल्प LIG उत्पन्न गटांसाठी 833 सदनिकांची ऑनलाईन सोडत जाहीर केली. नोंदणी, अर्ज आणि पेमेंटची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन असूनही घरे सेक्टर 12 आणि सेक्टर 30-32 मध्ये उपलब्ध आहेत. 

PREV
15
पुण्यात स्वतःचं घर घेण्याची सुवर्णसंधी!

PMRDA Housing Scheme : पुणे महानगर प्रदेशात (PMRDA) स्वतःच्या हक्काचं घर असावं, असं स्वप्न पाहणाऱ्या नागरिकांसाठी अत्यंत दिलासादायक बातमी समोर आली आहे. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने अत्यल्प उत्पन्न गट (EWS) आणि अल्प उत्पन्न गट (LIG) यांच्यासाठी एकूण 833 सदनिकांची मोठी ऑनलाईन सोडत जाहीर केली आहे.

या योजनेतील विशेष बाब म्हणजे, नोंदणीपासून ते अर्ज भरणे आणि अनामत रक्कम भरण्यापर्यंतची संपूर्ण प्रक्रिया पूर्णतः ऑनलाईन असणार आहे. त्यामुळे इच्छुक नागरिकांना कार्यालयांचे फेरे टाळता येणार असून प्रक्रिया अधिक सोपी आणि पारदर्शक होणार आहे.

25
कुठे आणि किती घरे उपलब्ध?

ही सोडत दोन प्रमुख सेक्टरमध्ये राबवली जात आहे.

सेक्टर (पेठ) क्रमांक 12

एकूण सदनिका : 340

EWS (अत्यल्प उत्पन्न गट) : 55

LIG (अल्प उत्पन्न गट) : 285

या सेक्टरमधील EWS गटातील पात्र लाभार्थ्यांना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 2.50 लाख रुपयांचे अनुदान मिळणार असून, त्यामुळे घराची किंमत अधिक परवडणारी ठरणार आहे.

सेक्टर (पेठ) क्रमांक 30–32

एकूण सदनिका : 493

EWS : 306

LIG : 187

35
अर्ज प्रक्रियेचं संपूर्ण वेळापत्रक

PMRDA कडून ऑनलाईन अर्ज प्रक्रियेचं सविस्तर वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे.

ऑनलाईन नोंदणी सुरू :

सोमवार, 15 डिसेंबर, सकाळी 11 वाजता

ऑनलाईन अर्ज व पेमेंट सुरू :

शुक्रवार, 19 डिसेंबर, दुपारी 12 वाजता

नोंदणी व अर्जाची अंतिम मुदत :

27 जानेवारी 2026, सायंकाळी 5 वाजेपर्यंत

ऑनलाईन पेमेंटची अंतिम वेळ :

27 जानेवारी 2026, रात्री 11.59 पर्यंत

RTGS / NEFT द्वारे अनामत रक्कम भरण्याची अंतिम तारीख :

28 जानेवारी 2026, दुपारी 3 वाजेपर्यंत

45
सोडतीसंदर्भातील महत्त्वाच्या तारखा

अर्जांची प्रारूप यादी

11 फेब्रुवारी 2026, सायंकाळी 7 वाजता

आक्षेप नोंदवण्याची अंतिम मुदत :

12 फेब्रुवारी 2026, सायंकाळी 5 वाजेपर्यंत

अंतिम यादी जाहीर :

17 फेब्रुवारी 2026, सायंकाळी 7 वाजता

ऑनलाईन सोडत :

26 फेब्रुवारी 2026, सकाळी 10 वाजता

निवड झालेल्या व प्रतीक्षा यादीतील अर्जदारांची घोषणा

26 फेब्रुवारी 2026, सायंकाळी 6 वाजता

55
अधिक माहितीसाठी कुठे संपर्क साधाल?

इच्छुक नागरिकांनी सविस्तर माहिती, अटी व शर्ती आणि अर्जासाठी housing.pmrda.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन PMRDA कडून करण्यात आले आहे. तसेच, सदनिकांच्या संख्येत आवश्यकतेनुसार बदल करण्याचे सर्व अधिकार PMRDA महानगर आयुक्तांकडे राखीव असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...
Read more Photos on

Recommended Stories