Palghar Astrologer: 'मी महादेव, तू पार्वती'... म्हणत महिलेवर अत्याचार

Published : Mar 27, 2026, 01:02 PM IST
Palghar Astrologer Accused of Assaulting Woman Using Mahadeva Parvati Ploy

सार

Palghar Astrologer Accused of Assaulting Woman Using Mahadeva Parvati Ploy: नाशिकच्या अशोक खरात गुरुजी प्रकरणानंतर आता पालघरमधील एका ज्योतिषाचं कांड समोर आलं आहे. 'मी महादेव, तू पार्वती' असं सांगून महिलेवर अत्याचार केल्याचा आणि व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल केल्याचा आरोप या ज्योतिषावर आहे.

Palghar Astrologer Accused of Assaulting Woman Using Mahadeva Parvati Ploy पालघर (27 मार्च): राज्यात सध्या भोंदूबाबा आणि स्वयंघोषित महाराजांची रासलीला प्रकरणं एकापाठोपाठ एक समोर येत आहेत. नाशिकचा स्वयंघोषित देवमाणूस अशोक खरात याचे अनेक महिलांसोबतचे व्हिडिओ समोर आल्यानंतर त्याला अटक झाली. दुसरीकडे, गोव्यात भाजप नेत्याच्या मुलाला अल्पवयीन मुलींचा वापर केल्याप्रकरणी अटक झाली, तर महाराष्ट्रातील एका मंत्र्याचा तृतीयपंथीयासोबतचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. या सगळ्या घडामोडींनंतर आता पालघरमधील आणखी एका ज्योतिषाचं प्रकरण समोर आलं आहे. नाशिकच्या अशोक खरात प्रकरणाने खळबळ उडाल्यानंतर, एका महिलेने पालघरच्या ज्योतिषाने फसवणूक करून अत्याचार केल्याची तक्रार दिली आहे.

मी महादेव, तू पार्वती

या ज्योतिषाने स्वतःला देवमाणूस आणि महादेवाचा अवतार असल्याचं भासवलं. 'मी महादेव आहे आणि तू पार्वती आहेस,' असं सांगून त्याने महिलेच्या डोक्यात धार्मिक गोष्टी भरवल्या आणि तिच्या अडचणींचा गैरफायदा घेतला. त्याने महिलेला आध्यात्मिक गोष्टींमध्ये गुंतवून ठेवलं आणि नंतर तिचा व्हिडिओ रेकॉर्ड करून तिला वारंवार धमकावत तिचं शोषण केलं, असा आरोप पीडित महिलेने आपल्या तक्रारीत केला आहे.

नाशिक प्रकरणानंतर महिलेने दाखवलं धाडस

नाशिकचा स्वयंघोषित देवमाणूस अशोक खरात याच्या अटकेची बातमी समोर आल्यानंतर या महिलेने धाडस करून 40 वर्षीय ज्योतिषाविरोधात तक्रार दाखल केली. पुण्यातील रहिवासी असलेल्या या महिलेची 2023 मध्ये या ज्योतिषाशी फेसबुकवरून ओळख झाली होती. ज्योतिषाचे काही व्हिडिओ आणि प्रवचनाचे रील्स पाहून प्रभावित झालेल्या या महिलेने आपल्या समस्या सांगून त्यावर उपाय विचारला होता.

हीच संधी साधून या ज्योतिषाने महिलेला भेटण्यासाठी थेट पुणे गाठलं. महिलेने त्याला भेटायला बोलावल्यावर त्याने काहीतरी धार्मिक विधी करण्याचं नाटक केलं. 'मी महादेवाचा अवतार आहे आणि या पूजेत तू पार्वती आहेस. महादेव-पार्वतीची पूजा करायची आहे,' असं सांगून त्याने काही मंत्र म्हटले आणि होमहवन केलं. 'आज दिवसभर तू पार्वती म्हणून राहायचं आहे,' असं सांगून त्याने महिलेवर अत्याचार केला. 'ही महादेवाची इच्छा आहे,' असं सांगून त्याने तिचं शोषण केलं.

यावेळी त्याने गुपचूप व्हिडिओ बनवला आणि नंतर तोच व्हिडिओ पाठवून महिलेला धमकावू लागला. तो तिला सतत ब्लॅकमेल करत होता. इतके दिवस शांत असलेली महिला नाशिकच्या अशोक खरात प्रकरणानंतर हिंमत करून आपल्या नातेवाईकांसोबत पोलीस स्टेशनमध्ये पोहोचली आणि तक्रार दाखल केली. यावेळी तिने काही व्हिडिओ आणि इतर पुरावेही पोलिसांना दिले आहेत. सध्या हा ज्योतिषी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या प्रकरणामुळे महाराष्ट्रात मोठी खळबळ उडाली आहे.

PREV
Maharashtra News (महाराष्ट्र बातम्या): Read Maharashtra LIVE Updates and Latest Marathi News Today. Check महाराष्ट्र राजकीय बातम्या, महाराष्ट्र क्राईम न्यूज, महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज. Watch Maharashtra Viral News Videos, Photos, Maharashtra Weather Updates in Marathi at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

Viral Video : भिवंडीत गुलाबजामच्या पाकात सापडला उंदीर, व्हिडिओ व्हायरल
Narendra Modi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून मोदींच्या २५ वर्षांच्या कारकिर्दीचं कौतुक