
Maharashtra : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी (27 एप्रिल) एक मोठे विधान करत म्हटले की, सर्व पाकिस्तानी नागिरकांची ओखळ पटवण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या गाइडलाइन्सनुसार, राज्यातून पाकिस्तानी नागरिकांना बाहेर काढण्याची व्यवस्था केली जात आहे. याशिवाय या मुद्द्यावरुन चुकीची बातमी पसरवू नये अशी विनंतही मुख्यमंत्र्यांनी नागरिकांना केली आहे.
नक्की काय म्हणाले मुख्यमंत्री?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मीडियाशी संवाद साधताना म्हटले की, "केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सुचनांनुसार आम्ही पाकिस्तानी नागरिकांना शोधले आहे. त्यांना देश सोडून जावेच लागेल. याशिवाय पाकिस्तानी नागरिकांना ट्रॅकिंग करण्याचे काम सुरू आहे. याबद्दलचा डेटा लवकरच पोलिसांकडून जारी केला जाईल. पण केंद्र सरकारच्या गाइडलाइनुसार पाकिस्तानी सिंधी हिंदू जे भारतात दीर्घकालीन व्हिसासाठी आलेत किंवा भारतीय नागरिकत्वासाठी अर्ज केला आहे त्यांना देश सोडावा लागणार नाहीये. याशिवाय महाराष्ट्रात शॉर्ट-टर्म व्हिसावर असणाऱ्यांना पाकिस्तानी नागरिकांना ओखळण्याचे काम राज्याने केले असून त्यांना परत पाठवेल जाईल."
दरम्यान, महाराष्ट्र पोलिसांकडून वेगवेगळ्या व्हिसावर राज्यातील पाकिस्तानी नागरिकांची ओखळ पटवण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. खरंतर, भारत सरकारने 27 एप्रिलला पाकिस्तानी नागरिकांचे सर्व व्हिसा रद्द करण्याचा आदेश दिला आहे. हा निर्णय 22 एप्रिलला पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आला आहे. या हल्ल्यामध्ये 26 निर्दोष नागरिकांना आपला जीव गमवावा लागला. यामध्ये बहुतांशजण पर्यटक होते. याशिवाय हल्ल्यानंतर पाकिस्तान आणि भारतामधील तणाव अधिक वाढला गेला आहे.