बायकोचा ऑनलाइन अश्लील व्हिडीओ पाहून पतीची उच्च न्यायालयात धाव

Published : Apr 28, 2025, 01:17 PM IST
mobile

सार

Nagpur : ऑनलाइन अश्लील व्हिडीओ पाहिल्यानंतर नागपूरमधील एका पतीने थेट कोर्टात धाव घेतली आहे. नक्की प्रकरण काय आहे जाणून घेऊया सविस्तर...

Nagpur News : नागपूरमधील एका पतीने पत्नीचा अश्लील व्हिडीओ ऑनलाइन पाहिल्याचा प्रकार समोर आला आहे. खरंतर, महिलेचे दुसऱ्या पुरुषासोबतचे काही आक्षेपार्ह व्हिडीओ पतीने एका ऑनलाइन साइटवर पाहिले. यामध्ये पत्नीला पाहून नवऱ्याला धक्का बसला. याच कारणास्तव पतीने उच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली. परंतु पतीने केलेला दावा सिद्ध होण्यासाठी पुरेसे पुरावे आढळले नाहीत. यामुळे न्यायालयाने पतीची याचिका फेटाळून लावली.

नक्की काय घडले?

पत्नीचे परपुरुषासोबतचे काही आक्षेपार्ह व्हिडीओ पॉर्न साइटवर अपलोड करण्यात आल्याची माहिती एका अज्ञात व्यक्तीने याचिकाकर्त्याला दिली होती. हे व्हिडीओ व्यक्तीने पाहिले असता त्यामध्ये माझीच पत्नी असल्याचा दावा केला. यामुळे थेट न्यायालयात याचिका दाखल केली. याशिवाय पतीने अब्रुनुकसानीची अंतर्गत तक्रारही केली होती. मात्र पुरेसे पुरावे नसल्याने काहीही सिद्ध झाले नाही.

याचिका दाखल केल्यानंतर त्यावर न्यायाधीश एम. डब्लू चांदवानी यांच्या समोर न्यायालयात सुनावणी झाली. यावर निर्णय देत न्यायलयाने स्पष्ट केले नाही, आरोपी पत्नीने व्हिडीओ स्वत:हून अपलोड केलेत किंवा ते सिद्ध देखील होत नाहीये. यामुळे काही कायद्याअंतर्गत ती निर्दोष आहे. याशिवाय तक्रार ही पत्नीवरील संशय आणि भावनांवर आधारित असल्याचे न्यायालयाने सुनावणीवेळी स्पष्ट केले.

PREV

Recommended Stories

Baba Adhav : ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांचे निधन, सत्यशोधकी विचारांचा अखेरचा दिवा मालवला
प्रवाशांसाठी तातडीची सूचना! लोणावळा यार्ड विस्तारामुळे रेल्वे वेळापत्रकात मोठा बदल; तुमची ट्रेन उशिरा धावणार का? लगेच तपासा!