पहलगाम हल्ल्यात वडील गमावलेल्या हेमंत जोशींचा मुलगा दहावीत 78 टक्के गुणांनी उत्तीर्ण

Published : May 14, 2025, 12:53 PM IST
Pahalgam Attack Victim Hemant Joshi Son

सार

डोंबिवलीमध्ये राहणाऱ्या हेमंत जोशींना पहलगाम हल्ल्यामध्ये जीव गमवावा लागला. यामुळे संपूर्ण कुंटुबावर दु:खाचा डोंगर कोसळला गेला.

Pahalgam Attack Victim Hemant Joshi Son : डोंबिवलीमध्ये राहणाऱ्या हेमंत जोशींना पहलगाम हल्ल्यामध्ये जीव गमवावा लागला. यामुळे संपूर्ण कुंटुबावर दु:खाचा डोंगर कोसळला गेला. पण नुकताच दहावीचा निकाल लागला असून हेमंत जोशींच्या मुलगा उत्तम गुणांनी पास झाला आहे.

22 एप्रिलला जम्मू-काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्यामध्ये 26 जणांना आपला जीव गमवावा लागला होता. यामध्ये डोंबिवलीमध्ये राहणारे हेमंत जोशी सुद्धा होते. खरंतर, हेमंत जोशींचा मुलगा ध्रुव देखील काश्मीरला वडीलांसोबत फिरायला गेला होता. अशातच नुकताच दहावीचा निकाल लागला असून ध्रुव उत्तम गुणांनी पास झाला आहे.

ध्रुवने दहावी बोर्डाच्या परीक्षेत 78 टक्के गुण मिळवत घवघवीत यश मिळवले आहे. ध्रुव हा डोंबिवलीमधील ओंकार इंटरनॅशनल स्कूलचा विद्यार्थी आहे. ध्रुवची दहावीची परीक्षा संपल्याने वडीलांनी काश्मीरचा प्लॅन केला होता. पण दहशतवादी हल्ल्यामध्ये हेमंत जोशींना आपला जीव गमवावा लागला.

ध्रुवने दहावीत यश मिळवले असले तरीही ते साजरे करण्याचे मन नसल्याचे म्हटले आहे. यश पाहण्यासाठी वडील नाहीत, स्वप्न पूर्ण करण्यासाठी वडीलांचा आधार नाही असेही ध्रुवने म्हटले आहे.

PREV
Maharashtra News (महाराष्ट्र बातम्या): Read Maharashtra LIVE Updates and Latest Marathi News Today. Check महाराष्ट्र राजकीय बातम्या, महाराष्ट्र क्राईम न्यूज, महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज. Watch Maharashtra Viral News Videos, Photos, Maharashtra Weather Updates in Marathi at Asianet Marathi News.

Recommended Stories

Viral Video : भिवंडीत गुलाबजामच्या पाकात सापडला उंदीर, व्हिडिओ व्हायरल
Narendra Modi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून मोदींच्या २५ वर्षांच्या कारकिर्दीचं कौतुक