शिवसेना UBT मधील फुटीवर कपिल सिब्बल संतप्त; हे लोकशाहीविरोधी असल्याचा केला दावा

Published : Jun 17, 2026, 05:07 PM IST
Uddhav Thackeray Dasara Melava Speech

सार

उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ६ खासदार शिंदे सेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. या राजकीय घडामोडीला 'ऑपरेशन टायगर' असे नाव दिले जात असून, ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी याला अनैतिक आणि असंवैधानिक म्हटले आहे. तर, संजय राऊत यांनी खासदारांना कोटींच्या ऑफर देऊन खरेदी केल्याचा आरोप केला आहे.

उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या ६ खासदार शिंदे सेनेत जाणार अशा चर्चा सुरु झाल्या आहेत. त्यावर जेष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे. सिब्बल यांनी बोलताना म्हटलं आहे की, हि परिस्थिती केवळ राजकीय नसून अनैतिक, बेकायदेशीर आणि असंवैधानिक असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

काय म्हणाले सिब्बल सिब्बल 

यांनी पक्षफोडीच्या राजकारणावर टीका करताना लोकांनी निवडून दिलेल्या जनादेशाचा आदर करणं आवश्यक असल्याचं म्हटलं आहे. लोकशाहीमध्ये एका पक्षाच्या चिन्हावर निवडून यायचं आणि परत दुसऱ्या पक्षात प्रवेश करायचा हे मूलभूत तत्वांच्या विरोधात असल्याचं सिब्बल यांनी म्हटलं आहे.

ठाकरे गटातील खासदार करणार शिंदे गटात प्रवेश 

ठाकरे गटातील खासदार शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचा चर्चा आधी सुरु झाल्या होत्या. आता त्या चर्चा खऱ्या होताना दिसत आहेत. या सर्व घडामोडींना ऑपरेशन टायगर असं नाव देण्यात आलं. शिंदे सेनेच्या नेत्यांकडून अनेकदा या नावाचा उल्लेख आपण ऐकला असेल. उपमुख्यमंत्री शिंदे रात्री दिल्लीकडे रवाना झाले होते.

संजय राऊत यांनी काय केला आरोप 

संजय राऊत यांनी यावर आरोप केला आहे. त्यांनी खासदारांना कोटींच्या ऑफर देऊन खरेदी केल्याचं पत्रकार परिषदेत सांगितलं आहे. ठाकरे गटाचे आमदार घेऊन एकनाथ शिंदे सरकारमध्ये गेले. आता परत ६ खासदार गेल्यानंतर ठाकरे गटाला मोठं खिंडार पडणार आहे. त्यामुळं उद्धव ठाकरे याबाबत काय निर्णय घेतात याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.

PREV
Maharashtra News (महाराष्ट्र बातम्या): Read Maharashtra LIVE Updates and Latest Marathi News Today. Check महाराष्ट्र राजकीय बातम्या, महाराष्ट्र क्राईम न्यूज, महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज. Watch Maharashtra Viral News Videos, Photos, Maharashtra Weather Updates in Marathi at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

Viral Video : भिवंडीत गुलाबजामच्या पाकात सापडला उंदीर, व्हिडिओ व्हायरल
Narendra Modi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून मोदींच्या २५ वर्षांच्या कारकिर्दीचं कौतुक