लग्नसमारंभात कॅमेरा हातात घ्यावा मी त्यांना काम देईल, नितेश राणे यांनी ठाकरेंवर केली टीका

Published : Jun 30, 2026, 04:07 PM IST
Maharashtra Minister Nitesh Rane

सार

आमदार सचिन अहिर यांनी पक्ष सोडल्यानंतर भाजप नेते नितेश राणे यांनी ठाकरे गटावर जोरदार टीका केली आहे. आदित्य ठाकरेंनी राजीनामा देऊन पुन्हा निवडून यावे असे आव्हान देतानाच, ठाकरेंच्या स्वभावामुळेच लोक पक्ष सोडून जात असल्याचे राणे म्हणाले. त्यांनी उबाठा गटाची तुलना टीएमसीशी करत महाराष्ट्रातही तशीच स्थिती निर्माण होईल, असा दावा केला आहे.

आमदार सचिन आहिर यांनी उद्धव ठाकरे यांना सोडचिट्ठी दिली आहे. आता एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केलं जात आहे. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात हा सामना आता रंगला आहे. भाजपचे मंत्री नितेश राणे यांनी या विषयावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. नितेश राणे यांनी यावेळी बोलताना महाराष्ट्रातील अभिषेक बॅनर्जी उबाठा गटाला खाली करणार आहे. टीएमसी सारखंच होणार आहे असं म्हटलं आहे.

आदित्य ठाकरेंबद्दल काय म्हणाले? 

आदित्य ठाकरे यांच्याबद्दल बोलताना राणे यांनी म्हटलं की, आदित्य ठाकरेंनी राजीनामा देऊन परत निवडून यावं. राजीनामा द्यावा आणि स्वतःच्या हिंमतीवर निवडून यावं. सचिन आहिर आणि सुनील शिंदे यांच्यामुळं ते सभागृहात बसतात. आता त्यांचं अवघड झालं असल्याचं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. यावेळी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.

उद्धव ठाकरेंबद्दल काय म्हणाले? 

नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्याबद्दल बोलताना मत व्यक्त केलं आहे. आता उद्धव ठाकरे यांनी वरळीतही एक सभा घ्यावी. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि त्यांच्या घरातील लोकांच्या स्वभावामुळं लोक सोडून जात आहेत. जो बाळासाहेबांचा झाला नाही, तो बाकीच्या लोकांचा काय होणार असं यावेळी नितेश राणे यांनी म्हटलं आहे.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Pune Crime: जमिनीच्या वादातून पोटच्या पोरांनीच आई-बापाला रस्त्यात अडवून काठ्यांनी बदडलं, इंदापूरमधील धक्कादायक घटना
खाद्यतेल विक्रेत्यांना मोठा दिलासा; सुटे तेल विक्रीवरील निर्बंधांची अंमलबजावणी वर्षभर पुढे ढकलली