मुंबई: दिवाळीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील आरोग्य खात्यातील कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी एक आनंददायक बातमी समोर आली आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) अंतर्गत कंत्राटी तत्वावर कार्यरत असलेल्या सुमारे ५०,००० कर्मचाऱ्यांच्या पगारात राज्य सरकारने १५ टक्के वाढ जाहीर केली आहे.
आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी यासंदर्भात माहिती देताना सांगितले की, जून २०२५ पासून ही पगारवाढ लागू होणार आहे. दीर्घकाळापासून वेतनवाढीसाठी आंदोलने करणाऱ्या कर्मचाऱ्यांना यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. विशेष म्हणजे, या पगारवाढीमुळे कर्मचाऱ्यांचे मनोबल उंचावेल आणि आरोग्य विभागाची कार्यक्षमता अधिक बळकट होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.