नाशिककर लक्ष द्या! रमजान ईदनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; घराबाहेर पडण्यापूर्वी 'हे' पर्यायी मार्ग तपासा

Published : Mar 20, 2026, 05:18 PM IST
traffic changes

सार

Nashik traffic diversions for Eid: रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरातील वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल करण्यात आले आहेत. उद्या, शनिवारी (२१ मार्च) सकाळी ७ ते दुपारी १२ वाजेपर्यंत ईदगाह मैदानाकडे जाणारे प्रमुख मार्ग बंद राहणार असून, नागरिकांच्या सोयीसाठी प्रशासनाने पर्यायी मार्ग जाहीर केले आहेत.

नाशिक: उद्या, शनिवारी (२१ मार्च) मुस्लिम बांधवांचा पवित्र सण 'रमजान ईद' मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. ईदच्या सामूहिक नमाज पठणासाठी नाशिकमधील ईदगाह मैदानावर मोठी गर्दी होत असते. ही गर्दी आणि सुरक्षितता लक्षात घेऊन नाशिक शहर वाहतूक शाखेच्या उपायुक्त किरथिका सी.एम. यांनी शहरातील वाहतूक व्यवस्थेत महत्त्वाचे बदल करण्याचे आदेश दिले आहेत.

हे मार्ग राहतील बंद (सकाळी ७ ते दुपारी १२ वाजेपर्यंत)

उद्या सकाळी ७ वाजेपासून ते नमाज प्रक्रिया संपेपर्यंत (साधारण दुपारी १२ पर्यंत) खालील मुख्य मार्ग सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद असतील.

त्र्यंबक नाका ते मायको सर्कल: दोन्ही बाजूंची वाहतूक बंद.

गडकरी सिग्नल ते चांडक सर्कल: दोन्ही बाजूंची वाहतूक बंद.

११ ठिकाणी बॅरिकेडिंग आणि कडक बंदोबस्त

शहरातील खालील महत्त्वाच्या ठिकाणी पोलिसांनी बॅरिकेड्स लावले असून, या परिसरातून प्रवास टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

१. सारडा सर्कल

२. वेद मंदिर रोड (घनश्याम लाँड्रीजवळ)

३. मायको सर्कल

४. सेंट फ्रान्सेस हायस्कूल (गोल्फ क्लब मार्ग)

५. जलतरण तलाव सिग्नल

६. मोडक सिग्नल

७. गडकरी सिग्नल

८. चांडक सिग्नल

९. महापालिका आयुक्त बंगला परिसर

१०. ठक्कर बाजार (मनसे कार्यालय परिसर)

११. अण्णाभाऊ साठे पुतळा व खडकाळी सिग्नल

तुमचे पर्यायी मार्ग (Alternative Routes)

वाहतूक कोंडी टाळण्यासाठी प्रशासनाने खालीलप्रमाणे पर्यायी मार्ग खुले ठेवले आहेत.

मूळ मार्ग,पर्यायी मार्ग (डायव्हर्शन)

मायको सर्कल ते मोडक सिग्नल,मायको सर्कल - चांडक सर्कल - संदीप हॉटेल मार्गे पुढे.

मोडक सिग्नल ते मायको सर्कल,सीबीएस (CBS) सर्कल - टिळकवाडी सिग्नल मार्गे पुढे.

गडकरी सिग्नल ते चांडक सर्कल,संदीप हॉटेल मार्गे इच्छित स्थळी.

चांडक सर्कल ते गडकरी सिग्नल,संदीप हॉटेल - मुंबई नाका मार्गे पुढे.

महत्त्वाची टीप

नागरिकांनी शक्यतो या काळात त्र्यंबक रोडवरील प्रवास टाळावा आणि वाहतूक पोलिसांनी दिलेल्या सूचनांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे.

PREV
Maharashtra News (महाराष्ट्र बातम्या): Read Maharashtra LIVE Updates and Latest Marathi News Today. Check महाराष्ट्र राजकीय बातम्या, महाराष्ट्र क्राईम न्यूज, महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज. Watch Maharashtra Viral News Videos, Photos, Maharashtra Weather Updates in Marathi at Asianet Marathi News.
RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...
Read more Articles on

Recommended Stories

Tukaram Mundhe : तुकाराम मुंढे न्यूयॉर्क टाइम्सच्या फ्रंट पेजवर 'रॉकस्टार'
Sangli Waste Plant : प्रदूषणाच्या तक्रारींनंतर सांगलीतील 10 मेगावॅटचा वीज प्रकल्प बंद