Ashok Kharat Scandal : नाशिकचा 'कॅप्टन' बाबा अटकेत, पेन ड्राईव्हमध्ये सापडले 58 महिलांसोबतचे अश्लील व्हिडिओ!

Published : Mar 20, 2026, 12:43 PM IST
Ashok Kharat Scandal : नाशिकचा 'कॅप्टन' बाबा अटकेत, पेन ड्राईव्हमध्ये सापडले 58 महिलांसोबतचे अश्लील व्हिडिओ!

सार

नाशिकमध्ये स्वतःला देवमाणूस म्हणवणाऱ्या कॅप्टन अशोक खरातला अटक झाली आहे. एका महिलेसोबतचा त्याचा अश्लील व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली. तपासात त्याच्याकडे तब्बल ५८ महिलांसोबतचे व्हिडिओ सापडले असून, त्याचे राजकीय लागेबांधे आणि अमाप संपत्तीही आता पोलिसांच्या रडारवर आहे.

Nashik : स्वतःला देवमाणूस आणि ज्योतिषी म्हणवणाऱ्या अशोक खरातच्या अटकेनंतर एकापाठोपाठ एक धक्कादायक खुलासे होत आहेत. पूजा, ज्योतिष आणि इतर समस्यांवर तोडगा काढण्याच्या बहाण्याने येणाऱ्या महिलांना तो टार्गेट करायचा. त्यांना ड्रग्ज देऊन किंवा धमकावून त्यांच्यावर अत्याचार करायचा, असा आरोप आहे. एका महिलेसोबतचा त्याचा अश्लील व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी अशोक खरातला बेड्या ठोकल्या. अटकेनंतर त्याच्याकडे तब्बल ५८ महिलांसोबतचे अश्लील व्हिडिओ सापडले आहेत. आता पोलिसांच्या तपासात खरातचे बड्या राजकीय नेत्यांशी असलेले संबंध आणि त्याच्या अफाट संपत्तीबद्दलही धक्कादायक माहिती समोर येत आहे.

अध्यात्म आणि धर्माच्या नावाखाली महिलांवर अत्याचार

अशोक खरात हा मर्चंट नेव्हीचा निवृत्त अधिकारी आहे. त्यामुळे तो 'कॅप्टन अशोक' नावाने ओळखला जातो. निवृत्त नौदल अधिकारी आणि अध्यात्मिक गुरू अशी ओळख असल्यामुळे लोक त्याच्यावर सहज विश्वास ठेवत होते. पण, तो आपल्याकडे येणाऱ्या महिलांचा लैंगिक छळ करत होता. याच प्रकरणातील एका व्हिडिओने सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे. मदतीसाठी येणाऱ्या जवळपास सर्वच महिलांचा त्याने गैरफायदा घेतला, असा आरोप त्याच्यावर आहे.

पोलिसांनी अशोक खरातचा एक पेन ड्राईव्ह जप्त केला आहे. यामध्ये ५८ वेगवेगळ्या महिलांसोबत शारीरिक संबंध ठेवल्याचे आणि त्यांचा लैंगिक छळ केल्याचे व्हिडिओ आहेत. यातील काही व्हिडिओ सोशल मीडियावरही लीक झाले आहेत.

राजकीय नेत्यांशी लागेबांधे

अशोक खरातचे अनेक मोठ्या राजकीय नेत्यांशी जवळचे संबंध होते. अनेक नेते त्याचा आशीर्वाद घेण्यासाठी त्याच्याकडे जायचे. याचे अनेक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. काही राजकारण्यांशी तर त्याचे नियमित संबंध होते, असंही म्हटलं जातंय.

अवैध संपत्तीची पोलीस चौकशी

अशोक खरातने अवघ्या काही वर्षांत शेकडो कोटींची संपत्ती जमवली आहे. या संपत्तीचा स्रोत शोधण्यासाठी आता पोलीस कामाला लागले आहेत. खरातने ही संपत्ती अवैध मार्गाने कमावली असल्याचा पोलिसांना संशय आहे. त्यामुळे या प्रकरणाचा तपास अधिक वेगाने सुरू आहे.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Summer Special Trains : उन्हाळी स्पेशल ट्रेनची घोषणा; मुंबई-पुणे ते नागपूरसाठी 106 फेऱ्या, प्रवाशांना मोठा दिलासा
Ashok Kharat Case : नाशिकमध्ये अशोक खरात प्रकरण गाजतंय; रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी तीव्र