Summer Special Trains : उन्हाळी स्पेशल ट्रेनची घोषणा; मुंबई-पुणे ते नागपूरसाठी 106 फेऱ्या, प्रवाशांना मोठा दिलासा

Published : Mar 20, 2026, 12:30 PM IST
Pitru Paksha special trains

सार

Summer Special Trains : उन्हाळ्याच्या सुट्टीत प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने मुंबई, पुणे आणि नागपूर दरम्यान 106 विशेष रेल्वे फेऱ्यांची घोषणा केली आहे. यामुळे विदर्भात जाणाऱ्या प्रवाशांचा प्रवास अधिक सोयीस्कर होणार आहे.

Summer Special Trains : उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये पुणे आणि मुंबईतून विदर्भाकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. मध्य रेल्वेने नागपूर आणि अमरावतीकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी 106 विशेष रेल्वे फेऱ्यांची घोषणा केली आहे. या निर्णयामुळे वाढत्या प्रवासी गर्दीवर नियंत्रण ठेवण्यास मदत होणार असून प्रवास अधिक सुलभ होणार आहे.

सीएसएमटी-नागपूर विशेष गाड्यांचे वेळापत्रक

मुंबईतील सीएसएमटी येथून गाडी क्रमांक 02141 ही द्विसाप्ताहिक विशेष गाडी 19 एप्रिल ते 14 जुलै दरम्यान दर रविवारी आणि मंगळवारी रात्री 12:20 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी 3:10 वाजता नागपूरला पोहोचेल.तर गाडी क्रमांक 02142 नागपूरहून दर रविवारी आणि मंगळवारी रात्री 8 वाजता सुटून दुसऱ्या दिवशी दुपारी 1:30 वाजता सीएसएमटी येथे पोहोचेल. या दोन्ही गाड्या मिळून एकूण 52 फेऱ्या करणार आहेत.

या स्थानकांवर थांबा

सीएसएमटी-नागपूर विशेष गाडी दादर, ठाणे, कल्याण, नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा या प्रमुख स्थानकांवर थांबणार आहे.या गाडीत वातानुकूलित आणि सामान्य श्रेणीतील विविध डबे उपलब्ध असतील.

पुणे-नागपूर-हडपसर विशेष गाडी

पुणे-नागपूर-हडपसर मार्गावरही साप्ताहिक विशेष गाडी चालवण्यात येणार आहे. गाडी क्रमांक 09469 ही 21 एप्रिल ते 14 जुलै दरम्यान दर मंगळवारी सायंकाळी 5:50 वाजता पुण्याहून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे 5:30 वाजता नागपूरला पोहोचेल. गाडी क्रमांक 09470 ही नागपूरहून दर बुधवारी सकाळी 8 वाजता सुटून त्याच दिवशी रात्री 7:30 वाजता हडपसर येथे पोहोचेल. या गाड्या एकूण 54 फेऱ्या करणार आहेत.

प्रवाशांसाठी मोठा दिलासा

उन्हाळ्यात वाढणारी प्रवासी संख्या लक्षात घेऊन करण्यात आलेली ही व्यवस्था प्रवाशांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे. विशेषतः विदर्भात जाणाऱ्या नागरिकांना या अतिरिक्त गाड्यांमुळे प्रवास अधिक सोयीस्कर आणि आरामदायी होणार आहे.

PREV
Maharashtra News (महाराष्ट्र बातम्या): Read Maharashtra LIVE Updates and Latest Marathi News Today. Check महाराष्ट्र राजकीय बातम्या, महाराष्ट्र क्राईम न्यूज, महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज. Watch Maharashtra Viral News Videos, Photos, Maharashtra Weather Updates in Marathi at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

Nashik Kumbh Mela: रशिया-युक्रेन युद्ध विसरून दोन मित्र नाशिकच्या कुंभमेळ्यात!
Pune Crime : लंडनमध्ये शिकणारी पुण्यात मृतावस्थेत; ऑनलाईन फूड ऑर्डरवरून उलगडलं रहस्य, काय घडलं?