महाराष्ट्रातील हिल स्टेशन्स पावसाळ्यात एका वेगळ्याच रूपात दिसतात. हिरवळीने नटलेली निसर्गसौंदर्य, धबधबे आणि धुके यांचा मिलाफ पर्यटकांना भुरळ घालतो. महाबळेश्वर, तोरणमाळ, पाचगणी, माथेरान, लोणावळा ही काही लोकप्रिय ठिकाणे आहेत.
पावसात न्हालेलं महाबळेश्वर म्हणजे हिरवळीने नटलेलं स्वर्ग. स्ट्रॉबेरीची बाग, ढगांमध्ये हरवलेले पर्वत आणि धबधब्यांचे संगीतमय स्वर यांचा अनोखा मिलाफ!
26
2. तोरणमाळ – शांततेचा हिरवागार कवडसा
पर्यटकांच्या गर्दीपासून दूर, तोरणमाळ हे एक शांत आणि कमी प्रसिद्ध हिल स्टेशन. पावसाळ्यात येथील धुके, निसर्ग आणि पाणथळ वाटा मनाला अगदी प्रसन्न करतात.
36
3. पाचगणी – सूर्यास्ताचं स्वप्नवत ठिकाण
पाच पर्वतरांगांमध्ये वसलेलं हे ठिकाण म्हणजे फोटोप्रेमींसाठी स्वर्गच! सिडनी पॉइंट आणि पारशी पॉइंटवरून दिसणारे सूर्यास्ताचे रंग पाहता पाहता वेळ कधी निघून जातो हे कळतच नाही.