महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा तडाखा!, मुंबईसह ठाणे, पालघरमध्ये मेघगर्जनेसह पावसाचा इशारा

Published : May 18, 2025, 08:40 AM IST
Heavy Rain Alert In Delhi

सार

महाराष्ट्रात मान्सूनपूर्व पावसाने जोर धरला असून, हवामान खात्याने राज्यातील अनेक भागांसाठी वादळी पावसाचा इशारा दिला आहे. मुंबई, ठाणे, पालघरसह विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणातही पावसाची शक्यता आहे. 

महाराष्ट्रात मान्सूनपूर्व पावसाने जोर धरला असून, हवामान खात्याने राज्यातील अनेक भागांसाठी वादळी पावसाचा इशारा दिला आहे. विशेषतः मुंबई, ठाणे आणि पालघर या भागांत आज मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. काही ठिकाणी ताशी ३० ते ४० किमी वेगाने वारे वाहण्याचा अंदाज आहे.

हवामान विभागाने पुढील दोन दिवस राज्यात वादळी पावसाचा इशारा दिला आहे. मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात पावसाचे ढग जमा होत असून, वाऱ्यांचा वेगही वाढण्याची शक्यता आहे. विदर्भ, खानदेश, पुणे, नाशिक, सातारा, कोल्हापूर आणि धुळे जिल्ह्यांमध्ये देखील वीजांनिशी गडगडाटी पावसाचा अंदाज आहे. काही ठिकाणी ५० ते ६० किमी प्रतितास वेगाने वारे वाहू शकतात, असे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे.

पुणे, कोल्हापूर, सातारा आणि अहमदनगर (अहिल्यानगर) जिल्ह्यांमध्येही पुढील दोन दिवस वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भात पुढील ४-५ दिवस आणि मराठवाड्यातही पुढील पाच दिवस वादळी पावसाचा इशारा दिला असून, नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

यंदाच्या एप्रिल महिन्यात मान्सूनपूर्व पाऊस फारसा पडला नव्हता. मात्र मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून हवामानात लक्षणीय बदल झाले असून, अनेक भागांत अवकाळी पावसासोबत गारपीटही झाली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार यंदा मान्सूनही वेळेआधी दाखल होण्याची शक्यता असून, यामुळे राज्यातील शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण आहे.

राज्यभरात वादळी पावसाची शक्यता लक्षात घेता, नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी हवामान खात्याच्या सूचना लक्षपूर्वक पाळाव्यात. मान्सूनपूर्व पावसाचा हा जोर भविष्यातील पेरणीसाठी आशादायक ठरू शकतो.

PREV
RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...
Read more Articles on

Recommended Stories

नाताळात कन्फर्म तिकीट हवंय? कोकण रेल्वेची खास भेट!, 'या' विशेष गाड्यांचं संपूर्ण वेळापत्रक पाहा!
नोकरी गेली... कॅन्सरने जीव नको नकोसा केला! पुणे कर्मचाऱ्याचं 'न्याय मिळेपर्यंत' उपोषण; प्रशासनावर मोठी नामुष्की!