परळीत मानवी अमानुषतेचा कळस! तरुणाला डोंगरात नेऊन जबर मारहाण; २० जणांविरुद्ध गुन्हा, सातजण अटकेत

Published : May 18, 2025, 07:13 AM ISTUpdated : May 18, 2025, 07:34 AM IST
beed

सार

परळीतील एका तरुणाला किरकोळ वादातून डोंगरात नेऊन अमानुष मारहाण करण्यात आली. मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, पोलिसांनी सात जणांना अटक केली आहे.

परळी: बीड जिल्ह्यातील परळी परिसरात पुन्हा एकदा मानवतेला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. केवळ किरकोळ वादाच्या कारणावरून एका तरुणाला डोंगरात नेऊन अमानुषपणे मारहाण करण्यात आली. या धक्कादायक प्रकारामुळे संपूर्ण जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे.

काय घडलं नेमकं?

शुक्रवारी दुपारी शिवराज दिवटे हा आपल्या मित्रासोबत परळीतील जलालपूर येथील एका मंदिरात पंगतीच्या जेवणासाठी गेला होता. जेवणानंतर तो थर्मल रोडमार्गे लिंबुटा गावाकडे जात असताना, एका पेट्रोल पंपासमोर अचानक चार दुचाकीस्वारांनी त्यांची दुचाकी अडवली.

या तरुणांनी शिवराज याला जबरदस्तीने दुचाकीवर बसवून टोकवाडीच्या डोंगराजवळील माळरानात नेले. तिथे त्याला लोखंडी रॉड, कत्ती, बेल्ट आणि लाकडी काठ्यांनी बेदम मारहाण करण्यात आली. इतकंच नाही, तर त्याला जबरदस्तीने पायावर डोके टेकवायला भाग पाडण्यात आले.

व्हिडीओ करून सोशल मीडियावर व्हायरल!

या प्रकारात सामील असलेल्या आरोपींनी संपूर्ण मारहाणीचे व्हिडीओ शूटिंग केले आणि ते समाजमाध्यमांवर व्हायरल केले. यामुळे या प्रकाराबाबत समाजात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

पोलिसांचा वेगवान तपास

शिवराज दिवटे यांच्या फिर्यादीवरून परळीच्या संभाजीनगर पोलीस ठाण्यात शनिवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास २० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. यातील सात जणांना अटक करण्यात आली असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे.

आरोपींची नावे पुढीलप्रमाणे:

समाधान मुंडे, रोहित मुंडे, आदित्य गीते, ऋषिकेश गिरी, प्रशांत कांबळे, संमित्र शिंदे, सौमित्र गोरे, रोहन वागलकर, सुराज्य गित्ते, सूरज मुंडे यांचा यात समावेश आहे. उर्वरित ११ आरोपी अद्याप ओळख पटलेले नाहीत. हे सर्व आरोपी टोकवाडी, डाबी, नंदागौळ व परळी परिसरातील रहिवासी आहेत.

प्रकरणात जातीय रंग न देण्याचे आवाहन

पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी घटनेबाबत गंभीर दखल घेतली असून, सर्व आरोपींवर कठोर कारवाईचे निर्देश दिले आहेत. त्यांनी नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन करत स्पष्ट केले की, “या घटनेला कोणत्याही जातीय किंवा धार्मिक रंगात रंगवू नये. हा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न असून, संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल.”

संपूर्ण परळीतून निषेध

या अमानुष घटनेनंतर परळीत अनेकांनी सोशल मीडियावर आणि प्रत्यक्षातही या कृत्याचा तीव्र निषेध नोंदविला आहे. जिल्ह्यात कायदा-सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी प्रशासन सज्ज असून, पुढील तपास जलदगतीने सुरू आहे.

PREV
RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...
Read more Articles on

Recommended Stories

मोठी बातमी! शेतकरी कुटुंबाला मिळतील 'एवढे' लाख रुपये, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा? जाणून घ्या संपूर्ण माहिती!
Ladki Bahin Yojana : २१०० रुपये नेमके कधी मिळणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची विधानसभेत ठाम घोषणा