माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे 'या' तारखेला मिळणार, अजित पवार यांनी दिली माहिती

महाराष्ट्र सरकारने लाडकी माझी लाडकी बहीण योजना जाहीर केली आहे, ज्यासाठी महिलांनी मोठ्या प्रमाणात अर्ज करणे सुरू केले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पारनेर येथे या योजनेबाबत माहिती दिली. त्यांनी सांगितले की, अर्ज फॉर्म नीट भरावा लागेल.

vivek panmand | Published : Jul 22, 2024 9:58 AM IST

महाराष्ट्र सरकारच्या वतीने लाडकी माझी लाडकी बहीण योजना जाहीर केली आहे. या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी महिलांची गर्दी पाहायला मिळत आहे. अनेक महिला सेतू केंद्रावर जाऊन या योजनेसाठी अर्ज करत असल्याचे दिसून आले असून त्याबाबतचे अपडेट समोर आले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकत्याच पारनेर येथे याबाबत माहिती दिली आहे. 

सर्व उत्तर फॉर्मवरच देण्यात आली - 
सर्व उत्तर फॉर्मवरच देण्यात आली असल्याची माहिती देण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत बोलताना सांगितले आहे की, लाडकी योजनेचा फॉर्म अवश्य भरा. तो फॉर्म भरण्याचे काम शासन करत आहे. प्रशासनातील सहकारी, अंगणवाडीत काम करणाऱ्या महिला करतात. तो फॉर्म नीट नेटका भरा. ऑनलाईन फॉर्म भरताना काही अडचणी येत असतील तर काळजी करू नका. १ जुलैपासून ही योजना सुरु केली आहे. आम्ही अजून तुम्ही फॉर्म भरला नाही, तर पैसे कसे मिळतील, असे प्रश्नही उपस्थितीत होतात. पण याबद्दलची सर्व उत्तर त्या फॉर्मवर देण्यात आली आहे, असे अजित पवारांनी म्हटले.

दोन महिन्याचे पैसे एकत्र भेटणार - 
दोन महिन्याचे पैसे आम्ही एकत्र देणार असल्याचे उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितले आहे. जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये आम्ही एकत्र पैसे देणार आहोत, असेही यावेळी अजित पवार यांनी म्हटले आहे. ऑगस्ट महिन्यात तुम्ही फॉर्म भरलात आणि तुम्ही त्यामध्ये बरोबर बसलात तर तुम्हाला जुलै महिन्याचे पैसे मिळून जातील असेही अजित पवार यांनी म्हटले. रक्षाबंधनाच्या निमित्ताने पैसे देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. 

Share this article