मुंबईतील ग्रँट रोडमध्ये इमारत कोसळली, 20 ते 22 जण अडकले

Published : Jul 20, 2024, 01:42 PM IST
Mumbai Grant Road Building Collapse News

सार

Mumbai Grant Road Building Collapse News : मुंबईतील ग्रँट रोड येथे एका इमारतीचा काही भाग कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली 20 ते 22 नागरिक अडकल्याची माहिती मिळत आहे.

Mumbai Grant Road Building Collapse News : मुंबईतील ग्रँट रोड (Grant Road) येथे एक दुर्दैवी घटना घडलीय. ग्रँट रोड येथे एका इमारतीचा काही भाग कोसळून (Building Collapse) मोठी दुर्घटना घडली आहे. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली 20 ते 22 नागरिक अडकल्याची माहिती मिळत आहे. अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहे. इमारतीत अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु आहे.

ग्रॅण्ड रोड स्थानकाबाहेर रुबिनिसा मंझील ही इमारत आहे. या इमारतीचा तिसऱ्या आणि चौथ्या मजल्याचा काही भाग सकाळी 11 वाजता कोसळल्याची घटना घडली आहे. अग्निशमाक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत. या इमारतीत 20 ते 22 नागरिक अडकले आहेत. नागरिकांना सुखरुप बाहेर काढण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान शर्तीचे प्रयत्न करत आहेत.

आणखी वाचा : 

मुंबईत मुसळधार पावसामुळे वाहतूक कोंडी, अंधेरी सबवे तुंबला

PREV
RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...

Recommended Stories

तिकीट बुक करा! मराठवाड्यासाठी रेल्वेच्या ३ स्पेशल गाड्या सुरू; कुठून-कधी सुटणार? संपूर्ण माहिती एका क्लिकवर!
अरुंद एक्झिट, ताडाच्या पानांची रचना, मोठी DJ नाईट गोव्याच्या नाईटक्लबमधील किंकाळ्यांना जबाबदार!