Pune Porsche Car Accident : ससूनच्या डीनला पत्रकार परिषदेत मंत्र्याचं नाव घेणं भोवलं?, ससूनचे डीन डॉ. विनायक काळे सक्तीच्या रजेवर

ब्लड सॅम्पल फेकून देऊन लाच खाणाऱ्या डॉक्टर अजय तावरे, डॉक्टर श्रीहरी हरनोर यांचे वैद्यकीय शिक्षण विभागाच्यावतीने निलंबन करण्यात आले आहे. विनायक काळे यांना देखील तात्काळ सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे.

 

Rameshwar Gavhane | Published : May 30, 2024 6:34 AM IST / Updated: May 30 2024, 04:48 PM IST

पुणे रॅश ड्रायव्हिग प्रकरणाला आता नवं मिळालं आहे. या प्रकरणानंतर ससून रुग्णालयातील बेताल कारभार समोर आला आहे. त्यातच आता या प्रकरणात ससून रुग्णालय आणि डॉ. अजय तावरे हे रडारवर आहे. या प्रकरणासंदर्भात डॉ. विनायक काळेंनी पत्रकार परिषद घेत प्रकरणासंदर्भात आणि तावरे यांच्या नियुक्तीसंदर्भात माहिती दिली. हिच पत्रकार परिषद विनायक तावरेंना चांगलीच भोवल्याचं दिसत आहे. या पत्रकार परिषदेत त्यांनी हसन मुश्रीफांचं नाव घेतलं आणि त्यांच्यावर कारवाई करत संध्याकाळी त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं.

डॉ. अजय तावरे आणि श्रीहरी हळनोर यांनी रक्ताच्या नमुन्यात फेरफार केल्याने त्यांना पुणे पोलिसांनी अटक केली. त्यानंतर त्यांचं निलंबन देखील करण्यात आलं. अजय तावरेंचे ससून रुग्णालयातील कारनामे सर्वश्रृत आहेत. सरकारला देखील ते माहित आहे. मागील 17 वर्षात तावरेंनी एकना अनेक कारवामे ससूनमध्ये विविध पदावर एन्ट्री मिळवली. त्यानंतर आता ही झालेली त्यांची नियुक्तीसाठी आमदार सुनिल टिंगरेंच्या शिफारस होती. त्यानंतर हसन मुश्रीफांनी तावरेंनी नियुक्ती केली होती.

या संपूर्ण प्रकरणात ससूनचे डीन डॉ. विनायक काळे यांना अनेक प्रश्न विचारले जात होते. त्यानंतर विनायक काळे यांनी पत्रकार परिषदेत आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. यावेळी विनायक काळेंनी मी तावरेंची नियुक्ती केली नाही. सुनिल टिंगरेंची शिफारस आली होती. त्यावर मंत्र्यांनी निर्णय दिला, असं त्यांनी सांगितलं. यावेळी मी नाही पण हसन मुश्रीफांनी त्यांची नियुक्ती केली, असं ते म्हणाले. त्यानंतर संध्याकाळी लगेच मुश्रीफांनी कारवाई केली आणि थेट विनायक काळेंना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं आहे.

डॉ. अजय तावरे, डॉ. श्रीहरी हरनोर यांचं निलंबन

ब्लड सॅम्पल फेकून देऊन लाच खाणाऱ्या डॉक्टर अजय तावरे, डॉक्टर श्रीहरी हरनोर यांचे वैद्यकीय शिक्षण विभागाच्या वतीने निलंबन करण्यात आले आहे. शिवाय महत्वाचे म्हणजे बी जे मेडिकल कॉलेजेच अधिष्ठाता डॉक्टर विनायक काळे यांना देखील तात्काळ सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे. त्यांच्या जागेवर अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय बारामती या ठिकाणचे अधिष्ठाता डॉक्टर चंद्रकांत म्हस्के यांच्याकडे अतिरिक्त कारभार सोपवण्यात आला.

आणखी वाचा :

२४ तासांत मान्सून केरळमध्ये दाखल होणार?, हवामान विभागाने दिली महत्त्वाची अपडेट

 

Share this article