माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे अजून मिळाले नाहीत?, जाणून घ्या कारणे

Published : Aug 15, 2024, 09:16 PM IST
CM Ladki Bahin Yojna

सार

माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील ८० लाख महिलांना सन्मान निधी मिळाला आहे. १७ ऑगस्टपर्यंत पात्र महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत. आधार लिंक नसलेले बँक खाते, अर्ज फेटाळणे ही काही कारणे असू शकतात.

मुंबई: सध्या माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना दोन महिन्यांचे एकूण 3000 रुपये मिळत आहेत. आतापर्यंत राज्य सरकारने तब्बल 80 लाख महिलांच्या बँक खात्यात सन्मान निधी हस्तांरीत केला आहे. दरम्यान या योजनेसाठी कोट्यवधी अर्ज आलेले आहेत. पण यातील लाखो महिलांचे अर्ज बाद झाले आहेत तर काही महिलांना अद्याप सन्मान निधी मिळालेला नाही. याची काय कारणे असू शकतात हे आपण जाणून घेणार आहोत.

साधारण 48 लाख महिलांच्या बँक खात्यावर पैसे जमा

राज्य सरकारने पात्र महिलांना पैसे देण्याची प्रक्रिया चालू झाली आहे. रक्षाबंधनाच्या अगोदर खात्यावर पैसे पडल्यामुळे अनेक महिलांकडून आनंद व्यक्त केला जात आहे. 17 ऑगस्टपर्यंत आम्ही सर्व पात्र महिलांच्या बँक खात्यावर पैसे पाठवून देऊ, असे आश्वासन राज्य सरकारने दिलेले आहे. त्याची प्रत्यक्ष सुरुवात 14 ऑगस्ट रोजीपासून चालू झालेली आहे. आज म्हणजेच 15 ऑगस्ट रोजी साधारण 48 लाख महिलांच्या बँक खात्यावर पैसे पाठवण्यात आले आहेत. महिलांच्या बँक खात्यात 17 ऑगस्टपर्यंत पैसे येणार आहेत. त्यामुळे त्यासाठीची प्रक्रिया अजूनही चालूच आहे. 17 ऑगस्टपर्यंत महिलांनी पैसे येण्याची वाट पाहायला हवी.

महिलांनी बँक खात्याशी आधार नंबर लिंक करावा

बँकेत पैसे जमा न होण्याचे दुसरे महत्त्वाचे कारण हे बँक सिडिंग स्टेटस आहे. बँक खाते आधार नंबरशी लिंक नसलेल्या महिलांना या योजनेचा लाभ मिळालेला नाही. 17 तारखेपर्यंत पैसे हवे असतील तर महिलांनी बँक खात्याशी आधार नंबर लिंक करणे गरजेचे आहे. आपला आधार नंबर बँक खात्याशी लिंक आहे की नाही हे तपासणे गरजेचे आहे. UIDAI च्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन याविषयीची माहिती जाणून घेता येते. या योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्याशी आधार क्रमांक जोडण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याचे निर्देश महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले आहेत.

17 तारखेपर्यंत पैसे खात्यात जमा होणार

तुम्ही अर्ज दाखल करूनही तुमच्या बँक खात्यावर पैसे आले नसतील तर घाबरण्याचे कारण नाही. तुमचा अर्ज फेटाळण्यात आल्यास तुम्हाला बँक खात्यावर पैसे येणार नाहीत. पण तुमच्या अर्जासमोर पेंडिग, Review, Disapproved, असं दिसत असेल तर घाबरण्याचं कारण नाही. तुमच्या अर्जाची छाननी होत आहे. त्यामुळेच तुमच्या बँक खात्यात अद्याप पैसे जमा झालेले नाहीत. तुमचा अर्ज पात्र ठरवला गेला असूनही पैसे आलेले नसतील तर तुम्ही 17 तारखेपर्यंत वाट पाहायला हवी. 17 तारखेपर्यंत तुम्हाला पैसे मिळू शकतात.

आणखी वाचा : 

लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळेना? 'हे' कारण असू शकतात

 

PREV
RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...

Recommended Stories

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींची लॉटरी! खात्यात एकदम जमा होणार ४५०० रुपये; सरकारचा मोठा निर्णय काय?
Pune Mayor : मंजुषा नागपुरे यांची पुण्याच्या महापौरपदी निवड, जाणून घ्या त्यांच्याबद्दल A to Z माहिती