MLA's residence hostel Clash : आमदार निवासाच्या कॅन्टीनमध्ये पुन्हा राडा, यावेळी थेट वेटरच भिडले!

Published : Jul 09, 2025, 04:47 PM ISTUpdated : Jul 09, 2025, 04:48 PM IST
mla hostel waiters fight

सार

MLA's residence hostel Clash : आमदार निवासाच्या कॅन्टीनमधील वादंग थांबायचे नावच घेत नाहीये. निकृष्ट जेवणावरून आमदार संजय गायकवाड यांच्या राड्यानंतर आणि एफडीएची चौकशी सुरू असतानाच, आता कॅन्टीनमध्ये काम करणारे दोन वेटरच आपापसात भिडल्याची घटना समोर आली 

मुंबई : आमदार निवासाच्या कॅन्टीनमध्ये सुरू असलेले वादंग काही केल्या संपायला तयार नाहीत. शिळ्या वरणावरून शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी कर्मचाऱ्याला मारहाण केल्याची घटना ताजी असतानाच, आता याच कॅन्टीनमध्ये दोन वेटरमध्ये तुंबळ हाणामारी झाल्याचे समोर आले आहे. तिथे उपस्थित कर्मचारी आणि नागरिकांनी मध्यस्थी करून या दोघांना बाजूला केले, पण या घटनेने आमदार निवास कॅन्टीनमधील अनागोंदी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे.

कॅन्टीनमधील किरकोळ वादातून या दोन्ही वेटरनी एकमेकांना मारहाण करण्यास सुरुवात केली. उपस्थित लोकांनी आणि इतर कर्मचाऱ्यांनी हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली. कालच्या मोठ्या राड्यानंतर आता कॅन्टीनमधील कर्मचाऱ्यांमध्येच मारामारीचे प्रकार घडू लागल्याने कॅन्टीनच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

अन्न व औषध प्रशासन (FDA) कॅन्टीनमध्ये दाखल

दरम्यान, आमदार निवासस्थानाच्या कॅन्टीनमधील निकृष्ट जेवण आणि मारहाणीच्या घटनेनंतर अन्न व औषध प्रशासन (FDA) आता सक्रिय झाले आहे. एफडीएचे अधिकारी आमदार निवासच्या कॅन्टीनमध्ये दाखल झाले असून, त्यांनी कॅन्टीनमधील सर्व गोष्टींची आणि अन्नाची कसून तपासणी सुरू केली आहे. आमदार संजय गायकवाड यांच्या तक्रारीनंतर आणि मारहाणीच्या माहितीनंतर प्रशासन खडबडून जागे झाले आहे. या तपासणीतून आता या कॅन्टीनच्या अन्नसुरक्षेबाबत काही धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या सततच्या घटनांमुळे आमदार निवासाच्या कॅन्टीनचा कारभार नेमका कसा चालतोय, याबद्दल गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

 

PREV
RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...
Read more Articles on

Recommended Stories

महाराष्ट्रात 'थंडीचा कहर'! तापमान 'मायनस'मध्ये जाणार; 'या' ३ जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट, तुमच्या शहराचं तापमान तपासा!
मोठी बातमी! नवी मुंबईकरांसाठी 'जॅकपॉट'! तुमच्या प्रवासात होणार 'हा' सर्वात मोठा बदल; दोन नवीन रेल्वे स्थानकांची घोषणा!