महाराष्ट्रातील पर्यटकांसाठी 9 जूनपासून विशेष ट्रेन, या ठिकाणांना देता येणार भेट

Published : May 15, 2025, 10:33 AM IST
Railway big announcement in Rajasthan

सार

येत्या 9 जूनपासून विशेष पर्यटन ट्रेन चालवली जाणार आहे. या ट्रेनच्या माध्यमातून नागरिकांना ऐतिहासिक किल्ले आणि धार्मिक स्थळांना भेट देता येणार आहे.

Maratha Tourism Train : येत्या 9 जूनपासून विशेष पर्यटन ट्रेन चालवली जाणार आहे. या ट्रेनच्या माध्यमातून नागरिकांना ऐतिहासिक किल्ले आणि धार्मिक स्थळांना भेट देता येणार आहे. या 6 दिवसांच्या प्रवासात पर्यटकांना महाराष्ट्रातील अनेक ऐतिहासिक किल्ले व धार्मिक स्थळांना भेट देण्याची संधी देणार आहे. या ट्रेनचा उद्देश मराठा साम्राज्याचा गौरवशाली इतिहास दाखवणे हा आहे.

प्रवासाच्या खास गोष्टी

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथून ट्रेन सुटणार असून दादर आणि ठाणे येथे प्रवाशांना ट्रेनमध्ये चढता येणार आहे. याशिवाय ट्रेन काही ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांपर्यंत पोहोचवण्यास मदत करणार आहे.

1. छत्रपती_शिवाजी_महाराज_टर्मिनस/दादर/ठाणे – येथून ट्रेनचा प्रारंभ

2. रायगड_किल्ला

3. पुणे परिसर

लाल महाल

कसबा गणेश मंदिर

शिवसृष्टी_प्रकल्प

4. शिवनेरी_किल्ला – शिवाजी महाराजांचे जन्मस्थान

5. भीमाशंकर_ज्योतिर्लिंग मंदिर

6. प्रतापगड_किल्ला

7. पन्हाळगड_किल्ला

8. कोल्हापूर – करवीर निवासिनी अंबाबाई मंदिर

पॅकेजबद्दल अधिक माहिती

पॅकेजमध्ये नागरिकांना तीन प्रकारच्या कोचमधून प्रवास करता येणार आहे. यामध्ये इकोनॉमी-स्लीपर क्लास, आराम-एसी 3 टियर, सुपीरियर-एसी टियरचा समावेश आहे. भाड्यामध्ये रेल्वेचा प्रवास, राहण्याची सोय, जेवण, फिरणे आणि परतीचा प्रवास सर्व गोष्टी समाविष्ट आहे.प्रवासासंदर्भातील अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

PREV

Recommended Stories

नाताळात कन्फर्म तिकीट हवंय? कोकण रेल्वेची खास भेट!, 'या' विशेष गाड्यांचं संपूर्ण वेळापत्रक पाहा!
नोकरी गेली... कॅन्सरने जीव नको नकोसा केला! पुणे कर्मचाऱ्याचं 'न्याय मिळेपर्यंत' उपोषण; प्रशासनावर मोठी नामुष्की!