महात्मा फुले जयंती : समाजसुधारणेचा दीप पेटवणारा क्रांतिकारक

Published : Apr 11, 2025, 11:36 AM IST

महात्मा ज्योतिराव फुले यांनी शोषित, वंचित आणि स्त्रियांच्या शिक्षणासाठी कार्य केले. त्यांनी सावित्रीबाई फुले यांच्यासोबत देशातील पहिली मुलींची शाळा सुरू केली आणि सत्यशोधक समाजाची स्थापना केली.

PREV
15
स्त्री-शिक्षणाचा दीपप्रज्वलन करणारा महानायक

महात्मा ज्योतिराव गोविंदराव फुले यांचा जन्म ११ एप्रिल १८२७ रोजी पुण्यात झाला. त्यांनी आयुष्यभर शोषित, वंचित आणि स्त्रियांसाठी कार्य केलं. स्त्री-शिक्षणाची बीजं रोवणारे ते भारतातील पहिले पुरोगामी विचारवंत ठरले.

25
सावित्रीबाई फुले यांच्यासोबत देशातील पहिली मुलींची शाळा

१८४८ मध्ये पुण्यात देशातील पहिली मुलींची शाळा सुरू करताना त्यांनी आपल्या पत्नी सावित्रीबाई फुले यांना शिक्षित केलं आणि शिक्षिका बनवलं. ही शाळा त्याकाळात क्रांतिकारी पाऊल ठरली.

35
सत्यशोधक समाजाची स्थापना

१८७३ मध्ये फुलेंनी सत्यशोधक समाज स्थापन केला. त्याचा उद्देश होता

  • जातिभेद दूर करणं 
  • विधवा विवाहास प्रोत्साहन 
  • ब्राह्मणेतर समाजाला न्याय मिळवून देणं
45
स्त्रियांसाठी आश्रयगृह आणि विधवा पुनर्विवाह

महात्मा फुलेंनी गर्भवती विधवांसाठी पहिलं आश्रयगृह सुरू केलं. त्यांनी स्त्रियांना केवळ शिक्षणच नाही, तर मानवतेचा आधार दिला. त्यांनी विधवांकरिता पुनर्विवाहास प्रोत्साहन दिलं, जे त्या काळात फार मोठं पाऊल होतं. 

55
अस्पृश्यांसाठी पाणवठ्यांची उभारणी

महात्मा फुलेंनी दलितांसाठी स्वतंत्र पाणवठे, विहिरी आणि विश्रामगृहे उभारली. ते म्हणत: "देव सगळ्यांचा आहे, मग त्याच्या पाण्यावर काहींचा हक्क का?"

Recommended Stories