Zipline Accident : ३५०० फूट हवेत लटकला पर्यटक, महाराष्ट्रातील थरारक घटनेचा व्हिडिओ व्हायरल

Published : Jul 30, 2026, 04:02 PM IST
Nandurbar Zipline Accident

सार

महाराष्ट्रातील तोरणामाळ हिल स्टेशनवर एका पर्यटकासाठी झिपलाइनची थरारक राइड चांगलीच अंगलट आली. साडेतीन हजार फूट खोल दरीवर तो हवेतच अडकला. सुदैवाने, बचाव पथकाने वेळेवर पोहोचून त्याची सुखरूप सुटका केली.

नंदुरबार : सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. यात महाराष्ट्रातील तोरणामाळमधील सीताखाई पॉईंटवर एक पर्यटक साडेतीन हजार फूट खोल दरीवर झिपलाइनच्या मधोमध असहाय्यपणे लटकलेला दिसतोय. एक थरारक अनुभव म्हणून सुरू झालेला हा खेळ पर्यटकाच्या जीवावर बेतला असता. नव्याने सुरू झालेल्या झिपलाइनवर तरुण अडकल्याने काही काळ सगळ्यांच्याच काळजाचा ठोका चुकला होता.

बचाव पथकाने केली सुखरूप सुटका

मिळालेल्या माहितीनुसार, पर्यटक झिपलाइनवर अडकल्याची माहिती मिळाल्यानंतर ऑपरेटर्सना तातडीने याची माहिती देण्यात आली. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता बचावकार्य सुरू केलं. अडकलेल्या पर्यटकापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांना बराच वेळ लागला. अखेर मोठ्या प्रयत्नांनंतर ऑपरेटर्सनी त्या पर्यटकाला कोणतीही इजा न होता सुखरूप जमिनीवर आणलं.

 

 

सुरक्षेच्या प्रश्न ऐरणीवर

या थरारक बचावकार्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांकडून संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. अनेकांनी बचाव पथकाच्या तत्परतेचं आणि कौशल्याचं कौतुक केलं आहे. तर काहींनी पर्यटन स्थळांवरील अशा साहसी खेळांच्या सुरक्षेच्या उपाययोजना आणि देखभालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा अशा धोकादायक साहसी खेळांसाठी कडक सुरक्षा तपासणी आणि आपत्कालीन तयारी किती महत्त्वाची आहे, हे अधोरेखित झालं आहे. तसंच अशा साहसी खेळांच्या ठिकाणी एखाद्या पर्यटकाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. हे सुरक्षेसंबंधी नियम, अटी साहसी खेळांच्या ठिकाणी किती पाळले जातात हादेखील मोठा प्रश्नच आहे. त्यामुळे पर्यटकांनी अशा ठिकाणी योग्य ती काळजी घेणं महत्त्वाचं ठरेल.

PREV
Maharashtra News (महाराष्ट्र बातम्या): Read Maharashtra LIVE Updates and Latest Marathi News Today. Check महाराष्ट्र राजकीय बातम्या, महाराष्ट्र क्राईम न्यूज, महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज. Watch Maharashtra Viral News Videos, Photos, Maharashtra Weather Updates in Marathi at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

Viral Video : भिवंडीत गुलाबजामच्या पाकात सापडला उंदीर, व्हिडिओ व्हायरल
Narendra Modi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून मोदींच्या २५ वर्षांच्या कारकिर्दीचं कौतुक