उन्हाचा तडाखा टाळण्यासाठी डॉक्टरांनी आणि प्रशासनाने काही महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत.
भरपूर पाणी प्या: लिंबू सरबत, ताक आणि पाण्याचे सतत सेवन करा.
थेट ऊन टाळा: दुपारी १२ ते ४ या वेळेत शक्यतो बाहेर पडणे टाळा.
पेहराव: सुती आणि हलक्या रंगाचे कपडे वापरा.
लक्षणे ओळखा: चक्कर येणे किंवा जास्त थकवा जाणवल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधा.