Maharashtra Weather Update : राज्यात हवामानाचा लहरीपणा कायम; मार्चमध्ये उष्णतेचा जोर वाढण्याचा IMD चा इशारा

Published : Mar 02, 2026, 08:06 AM IST
imd weather heat wave alert IN Rajasthan

सार

Maharashtra Weather Update : राज्यात गेल्या काही दिवसांत अवकाळी पावसानंतर पुन्हा उकाडा वाढू लागला आहे. भारतीय हवामान विभागाने मार्च महिन्यात तापमानात लक्षणीय वाढ होण्याचा अंदाज वर्तवला असून कोकणात दमट हवामान राहण्याची शक्यता आहे.

Maharashtra Weather Update : राज्यात गेल्या काही दिवसांपासून हवामानाचा लहरीपणा पाहायला मिळत आहे. कधी थंडी, कधी अवकाळी पाऊस तर आता अचानक वाढलेला उकाडा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. नुकताच हवामान खात्याने तापमान वाढीचा इशारा दिला असून मार्च महिन्यात उष्णतेचा जोर अधिक वाढण्याची शक्यता वर्तवली आहे.

अवकाळीनंतर पुन्हा उकाडा वाढला

मागील आठवड्यात राज्यात जोरदार अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. या पावसामुळे शेतीचे नुकसान झाले असून नुकसानभरपाईची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. मात्र पावसानंतर लगेचच हवामान कोरडे झाले आणि उष्णतेत वाढ झाली आहे. फेब्रुवारी महिन्यात सुरुवातीला पाऊस आणि त्यानंतर उकाडा अशी स्थिती पाहायला मिळाली.

कोकणात दमट हवामानाचा इशारा

IMD च्या अंदाजानुसार कोकण पट्ट्यात दमट आणि उष्ण वातावरण राहण्याची शक्यता आहे. राज्यातील बहुतांश भागात आज तापमानात वाढ होणार असून नागरिकांना उन्हाचा अधिक त्रास जाणवू शकतो.

कुठे किती तापमान?

निफाड येथे राज्यातील नीचांकी तापमान 11.7 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले. तर अमरावती येथे उच्चांकी 36.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. यावरून राज्यातील विविध भागांमध्ये तापमानात मोठी तफावत दिसून येत आहे.

मार्चमध्ये तापमानात लक्षणीय वाढ

फेब्रुवारी संपताच उन्हाची तीव्रता वाढू लागली आहे. मार्च महिन्याच्या पहिल्याच दिवशी हवामान खात्याने तापमान वाढीचा अलर्ट जारी केला होता. येत्या काही दिवसांत कोरडे आणि निरभ्र हवामान राहणार असून, थंडी आणि पावसाचा प्रभाव पूर्णपणे कमी होईल, असा अंदाज आहे. यंदाही उन्हाळा अधिक तीव्र राहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

PREV
Maharashtra News (महाराष्ट्र बातम्या): Read Maharashtra LIVE Updates and Latest Marathi News Today. Check महाराष्ट्र राजकीय बातम्या, महाराष्ट्र क्राईम न्यूज, महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज. Watch Maharashtra Viral News Videos, Photos, Maharashtra Weather Updates in Marathi at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

Viral Video : भिवंडीत गुलाबजामच्या पाकात सापडला उंदीर, व्हिडिओ व्हायरल
Narendra Modi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून मोदींच्या २५ वर्षांच्या कारकिर्दीचं कौतुक