Maharashtra Weather Alert: हवामान खात्याने महाराष्ट्रात पुढील २४ तासांसाठी पावसाचा इशारा दिलाय. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस अपेक्षित आहे, तर विदर्भात ढगाळ वातावरण राहील.
पुढील 24 तास राज्यासाठी महत्त्वाचे! विजांच्या कडकडाटासह पाऊस कोसळणार
मुंबई: नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच महाराष्ट्रात हवामानात मोठा बदल दिसून येत आहे. हवामान खात्याने पुढील 24 तासांसाठी राज्यभरात पावसाचा अलर्ट जारी केला आहे. 2 नोव्हेंबर रोजी कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील अनेक भागांत विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
27
कोकणात ढगाळ वातावरण कायम
मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत उद्या दिवसभर आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी पडतील.
मुंबई तापमान: कमाल 33°C, किमान 25°C
37
मध्य महाराष्ट्रातही पावसाचा अंदाज
पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर आणि घाटमाथा परिसरात विजांच्या कडकडाटासह पावसाच्या सरी कोसळतील, असा अंदाज आहे.
छत्रपती संभाजीनगर, बीड, परभणी, हिंगोली, लातूर, नांदेड, धाराशिव आणि जालना जिल्ह्यांत ढगांच्या गडगडाटासह हलका पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
छत्रपती संभाजीनगर तापमान: कमाल 30°C, किमान 23°C
57
उत्तर महाराष्ट्रातही सरींची शक्यता
नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव आणि अहिल्यानगर जिल्ह्यांत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे.
नाशिक तापमान: कमाल 28°C, किमान 21°C
67
विदर्भात हवामान ढगाळ, पण पाऊस नाही
अकोला, अमरावती, नागपूर, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यांत ढगाळ वातावरण राहील, मात्र पावसाची शक्यता कमी आहे.
नागपूर तापमान: कमाल 30°C, किमान 23°C
77
तापमानात घट आणि आर्द्रतेत वाढ
राज्यात आर्द्रतेचे प्रमाण वाढले असून, तापमानात थोडी घट होण्याचा अंदाज आहे. हवामानातील या बदलामुळे सर्दी, ताप आणि व्हायरल संसर्गापासून बचावासाठी नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी, असा सल्ला हवामान विभागाने दिला आहे.