MHADA Lottery 2025: पुणे म्हाडाची सुवर्णसंधी! 90 लाखांचं घर आता फक्त 28 लाखांत, जाणून घ्या कुठे आणि कधी अर्ज करायचा?

Published : Nov 01, 2025, 03:23 PM IST

MHADA Lottery 2025: पुणे म्हाडा लॉटरी 2025 अंतर्गत वाकडमधील 'Yashwin Urbo Centro' या प्रीमियम प्रकल्पात 28 फ्लॅट्ससाठी विशेष लॉटरी जाहीर झाली आहे. साधारणतः 90 लाख रुपये किमतीची ही 2/3 BHK घरे फक्त 28 लाखांच्या घरात उपलब्ध आहेत. 

PREV
15
पुणे म्हाडाची सुवर्णसंधी! 90 लाखांचं घर आता फक्त 28 लाखांत

पुणे: पुण्यात स्वतःचं घर असावं, हे अनेकांचं स्वप्न! पण वाढत्या घरांच्या किमतींमुळे हे स्वप्न अनेकदा हातच्या अंतरावर राहून जातं. मात्र, आता म्हाडा (MHADA) तुमचं हे स्वप्न साकार करण्यासाठी एक अफलातून संधी घेऊन आली आहे. पुणे म्हाडा लॉटरी 2025 अंतर्गत अशी घरे उपलब्ध झाली आहेत जी साधारणतः 90 लाख रुपये किमतीची आहेत, पण फक्त 28 लाखांत मिळणार आहेत! 

25
वाकडमध्ये स्वप्नातील घर, फक्त 28 लाखांत

पुण्यातील वाकड या लोकप्रिय परिसरात ‘Yashwin Urbo Centro’ या प्रीमियम प्रकल्पात म्हाडाने 28 फ्लॅट्ससाठी विशेष लॉटरी जाहीर केली आहे.

हा प्रकल्प भूमकर चौकाजवळ, इंदिरा गांधी कॉलेजच्या परिसरात, आणि हायवे टच लोकेशनवर उभारला जात आहे. सुप्रसिद्ध विलास जावळकर ग्रुप या प्रकल्पाचा विकास करत आहे. 

35
या प्रकल्पात 2 BHK आणि 3 BHK ची घरं

या प्रकल्पात 2 BHK आणि 3 BHK अशा आकर्षक घरांच्या पर्यायांचा समावेश आहे.

फ्लॅट्सचा कार्पेट एरिया 500 ते 600 स्क्वेअर फूट असून, किंमत ₹28.42 ते ₹28.74 लाखांदरम्यान आहे.

समान परिसरातील अन्य प्रकल्पांमध्ये याच दर्जाची घरे 80 ते 90 लाखांपर्यंत विकली जातात. त्यामुळे फक्त 28 लाखांत वाकडसारख्या लोकेशनवर घर मिळणं म्हणजे खरंच म्हाडाची सुवर्णसंधी आहे. 

45
अर्ज कसा करायचा?

अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन आणि सुलभ आहे.

घर घेऊ इच्छिणाऱ्यांनी https://lottery.mhada.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.

तेथे “Pune Board Lottery 2025” या विभागात जाऊन “Yashwin Urbo Centro, Wakad” हा प्रकल्प निवडा.

यानंतर नोंदणी, अर्ज भरणे, आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे आणि फी भरणे हे सर्व टप्पे तुम्ही सहजपणे पूर्ण करू शकता.

अर्ज करण्याची अंतिम तारीख : 20 नोव्हेंबर 2025, रात्री 11:59 वाजेपर्यंत 

55
का गमावू नका ही संधी?

पुण्यासारख्या शहरात फक्त 28 लाखांत घर घेण्याची संधी रोज येत नाही.

म्हाडाच्या या लॉटरीद्वारे उच्च दर्जाचं, प्राईम लोकेशनवरचं घर वाजवी दरात मिळू शकतं.

घर घेण्याचं स्वप्न साकार करायचं असेल, तर ही संधी हातातून जाऊ देऊ नका!

RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...
Read more Photos on

Recommended Stories