Maharashtra Weather Alert: महाराष्ट्रात पुन्हा वादळ-पावसाची हजेरी! 13 जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी

Published : Oct 30, 2025, 09:15 PM IST

Maharashtra Weather Alert: महाराष्ट्रात पुढील २४ तासांत पुन्हा वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाने कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भातील एकूण १३ जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला असून, नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन केले. 

PREV
16
महाराष्ट्रात पुढील २४ तासांत पुन्हा वादळी पावसाची शक्यता

मुंबई: महाराष्ट्रात पुढील २४ तासांत पुन्हा वादळी पावसाची शक्यता आहे. 31 ऑक्टोबर रोजी राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांत जोरदार पाऊस आणि वाऱ्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाने एकूण १३ जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे.

26
कोकण आणि मुंबई परिसर

पालघर आणि रायगड जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो. ठाणे, मुंबई, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. 

46
मराठवाडा

छत्रपती संभाजीनगरमध्ये वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे, जिथे यलो अलर्ट जारी केला आहे. जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांत हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. 

56
उत्तर महाराष्ट्र

धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक आणि नाशिक घाटमाथा परिसरात वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे, याठिकाणी यलो अलर्ट जारी केला गेला आहे.

66
विदर्भ

अकोला, बुलढाणा, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यांत पावसाची शक्यता नाही. अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि नागपूर जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता असून याठिकाणी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. राज्यातील हवामानातील बदलांमुळे नागरिकांनी आरोग्य आणि शेतीसाठी विशेष खबरदारी घेणे गरजेचे आहे.

Maharashtra News (महाराष्ट्र बातम्या): Read Maharashtra LIVE Updates and Latest Marathi News Today. Check महाराष्ट्र राजकीय बातम्या, महाराष्ट्र क्राईम न्यूज, महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज. Watch Maharashtra Viral News Videos, Photos, Maharashtra Weather Updates in Marathi at Asianet Marathi News.
RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...
Read more Photos on

Recommended Stories