देवेंद्र फडणवीसांना भाजपाची धुरा, महत्त्वाची जबाबदारी सोपवली

Published : Aug 12, 2024, 03:51 PM IST
Sachin Tendulkar, Devendra Fadnavis, Maha Vikas Aghadi, farmer protests, farmer protests, farmers

सार

लोकसभा निवडणुकीत झालेल्या फटक्यांनंतर, भाजपने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी देवेंद्र फडणवीस यांच्यावर राज्यातील उमेदवारांच्या तिकीट वाटपाची जबाबदारी सोपवली आहे. रविवारी झालेल्या कोअर कमिटीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

मुंबई: काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस हे दिल्लीत जाणार अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. लोकसभेत फटका बसल्यानंतर विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने मोठा निर्णय घेतला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यावर अत्यंत महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत राज्यातील भाजप उमेदवारांच्या तिकीट वाटपाचे सर्वाधिकार देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आले आहेत. रविवारी झालेल्या भाजप कोअर कमिटीच्या बैठकीत निर्णय झाल्याची माहिती आशिष शेलार यांनी दिला आहे.

भाजपा प्रदेश कार्यालयात कोअर कमिटीची पार पडली बैठक

भाजपा प्रदेश कार्यालयात कोअर कमिटीची बैठक रविवारी पार पडली. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्र विधानसभा प्रभारी भूपेद्र यादव, सह संघटन मंत्री शिवप्रकाश, मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, सरचिटणीस विनोद तावडे, पंकजा मुंडे उपस्थित होते. विधानसभा निवडणुकीसंदर्भातील तयारी, आढावा आणि नियोजन या बैठकीत ठरले आहे.

देवेंद्र फडणवीसांना निवडणुकीसाठी संपूर्ण अधिकार : आशिष शेलार

आशिष शेलार म्हणाले, जागावाटप जागांची निश्चिती बैठकीत ठरला आहे. देवेंद्रजींच्या नेतृत्वात त्यांना संपूर्ण अधिकार देऊन सुरू करण्याची भूमिका पक्षाने स्पष्ट केली आहे. मला वाटतं महाराष्ट्राच्या राजकारणाच्या आणि राजकीय संस्कृतीला काळीमा भासण्याचे काम सर्वात प्रथम कोणी केला असेल तर ते संजय राऊत आणि उबाठा सेना आणि मग उद्धवजींनी केले. पहिलं तर मतं आमच्याबरोबर घ्यायची आणि सत्ता दुसऱ्याबरोबर स्थापन करायची .

पंधरा दिवसांचा ठरला कार्यक्रम

प्रत्येक विधानसभामध्ये जिथे भाजपचे आमदार आहेत तिथे सर्व आमदार कार्यकर्त्यांसोबत स्नेहभोजन आणि कार्यकर्त्यांच्या सूचना ऐकणं याबद्दल नियोजनाचा भाग पूर्ण झाला. राज्यातील संपूर्ण 288 जागांवर संघटनेच्या मंडल युनिटवर राजकीय प्रस्ताव राज्य सरकारच्या अभिनंदन असे पारित करून गाव पातळीपर्यंत पोहोचवणे आणि त्यामध्ये जनसहभाग करणे याचा पंधरा दिवसांच्या पुढचा कार्यक्रम नियोजित करण्यात आला, असे आशिष शेलार म्हणाले.

निवडणुका जिंकण्याचे नियोजन आणि जागावाटप ठरलं

महायुतीमधील सर्व पक्षांचे आणि नेतृत्वांचे जागा निश्चित करण्याचा निर्णय झाला आहे. आमच्या सर्व मित्र पक्षांसोबत बैठक होतच आहेत. निवडणुका जिंकण्याचे नियोजन आणि त्यासोबत जागावाटप हा कार्यक्रम सुद्धा ठरला आहे. हे संपूर्ण देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात सुरू करण्याचे पक्षाने स्पष्ट केला आहे.

आणखी वाचा : 

उद्धव ठाकरेंवर टीका करत बावनकुळेंचा पलटवार, कोण खोटारडेपणा करतंय?

 

PREV
RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...

Recommended Stories

Nashik Accident News : सप्तश्रृंगी गडाच्या घाटात भीषण अपघात; संरक्षण कठडा तोडून इनोव्हा दरीत कोसळली, पाच जण ठार असल्याची भीती
Adiwasi Land Rules: आदिवासींची जमीन खरेदी-विक्री करता येते का? कायदा नेमकं काय सांगतो? जाणून घ्या महत्वाची माहिती