Guinness World Record: ६.८६ सेकंद, ५० मीटर अन् फुल स्प्लिट्स; महाराष्ट्राच्या लेकीचा नवा विश्वविक्रम

vivek panmand   | CMS
Published : Nov 18, 2026, 04:44 PM IST
6.86 Seconds, 50 Metres And Full Splits: Maharashtra Skater Sets Guinness World Records Record, CM Fadnavis Reacts

सार

महाराष्ट्राची स्केटिंगपटू सृष्टी धर्मेंद्र शर्मा हिने ५० मीटर लिंबो स्केटिंग अवघ्या ६.८६ सेकंदांत पूर्ण करत स्वतःचाच गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मोडला आहे. या एमबीबीएस विद्यार्थिनीच्या कौतुकास्पद कामगिरीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही शाबासकीची थाप दिली आहे.

महाराष्ट्रच्या एका तरुण स्केटिंगपटूने सलग ५० मीटर लिंबो स्केटिंग अवघ्या ६.८६ सेकंदांत पूर्ण करून स्वतःचाच गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मोडला आहे. फुल स्प्लिटमध्ये खाली जाणाऱ्या पोल्सखालून तिने ही अप्रतिम कामगिरी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही तिच्या या यशाचे भरभरून कौतुक केले आहे.

नागपूरजवळील उमरेडच्या सृष्टी धर्मेंद्र शर्मा हिने ८ ऑक्टोबर रोजी ही ऐतिहासिक कामगिरी नोंदवली. गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सने (GWR) शेअर केलेल्या व्हिडिओत, ही एमबीबीएसची विद्यार्थिनी आधी स्केटिंगवर वेग घेताना आणि नंतर फुल स्प्लिटमध्ये सलग पोल्सखालून जाताना दिसत आहे.

संपूर्ण ५० मीटरच्या अंतरात सृष्टीने आपला वेग, तोल आणि लवचिकता कमालीची जपली. पोल्सखालून जाताना वेग कमी न होऊ देता तिने अत्यंत शिताफीने हे अंतर पार केले.

Watch Viral Video

या नव्या विक्रमासह सृष्टीने स्वतःचेच जुने रेकॉर्ड्स मोडले आहेत. २०२५ च्या सुरुवातीला तिने हे आव्हान ७.४६ सेकंदांत पार केले होते, जे २०२३ मधील तिच्या ६.९४ सेकंदांच्या रेकॉर्डपेक्षा जास्त होते. आता ६.८६ सेकंदांची वेळ नोंदवून तिने पुन्हा एकदा स्वतःला सिद्ध केले आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सृष्टीचे या विश्वविक्रमी कामगिरीबद्दल अभिनंदन केले आहे. तिचा हा व्हिडिओ पाहून त्यांनी तिच्या चपळतेचे आणि अचूकतेचे तोंडभरून कौतुक केले.

खेळासोबतच सृष्टी 'सेव्ह अ गर्ल चाइल्ड' या सामाजिक संस्थेसाठीही काम करते. आपल्या रेकॉर्ड्सच्या माध्यमातून ती या अभियानाबाबत जनजागृती करत असते.

सध्या ती इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसचे शिक्षण घेत आहे. शिक्षण, स्केटिंगची आवड आणि सामाजिक बांधिलकी यांचा ती उत्तम मेळ घालत आहे.

PREV
Maharashtra News (महाराष्ट्र बातम्या): Read Maharashtra LIVE Updates and Latest Marathi News Today. Check महाराष्ट्र राजकीय बातम्या, महाराष्ट्र क्राईम न्यूज, महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज. Watch Maharashtra Viral News Videos, Photos, Maharashtra Weather Updates in Marathi at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

Father Throws Sons In Canal : 'पप्पा आम्ही मरु', वडापाव आणि चॉकलेट खायला नेलं अन् जन्मदात्यानेच मुलांना कालव्यात फेकलं
Women Reservation : सुप्रिया सुळेंची महिलांसाठी ५० टक्के आरक्षणाची मागणी