Maharashtra Rain Update : राज्यात 'या' भागात बुधवारी पावसाचा यलो अलर्ट, हवामान विभागाचा इशारा

Maharashtra Rain Update : राज्याच्या विविध भागात पावसाची हजेरी (Rain) लागल्याचे पाहायला मिळत आहे. बुधवारीही राज्यात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

 

Maharashtra Rain Update : सध्या राज्याच्या विविध भागात पावसाची हजेरी (Rain) लागल्याचे पाहायला मिळत आहे. कुठं जोरदार पाऊस होतोय, तर कुठं मध्यम ते हलक्या स्वरुपाचा पाऊस होत आहे. ज्या भागात चांगला पाऊस झालाय, त्या भागात शेतीच्या कामांना वेग आला आहे. दरम्यान, हवामान विभागानं (IMD) दिलेल्या माहितीनुसार आज बुधवारीही राज्याच्या काही भागात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

'या' भागात बुधवारी पावसाचा यलो अलर्ट

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार बुधवारी राज्यातील कोकणसह संपूर्ण विदर्भात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. बुधवारी कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांसाठी पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. बुधवारी संपूर्ण विदर्भात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात देखील पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

जुलै महिन्यात राज्यात जोरदार पावसाची शक्यता

काही भागात जरी जोरदार पाऊस होत असला तरी देखील अनेक भागात कमी पाऊस झाला आहे. कमी पाऊस असूनसुद्धा काही शेतकऱ्यांना मृग नक्षत्रात पेरण्या केल्या आहेत. चांगला पाऊस पडेल अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती. मात्र, पाऊस पडत नसल्याने शेतकऱ्यांवर दुभार पेरणीचे संकट ओढवले आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार जुलै महिन्यात देखील राज्यात जोरदार पावसाची शक्यता आहे.

ज्या भागात चांगला पाऊस झाला आहे, त्या भागात शेतीकामांना वेग आलाय. अद्यापही काही भागात पावसाची प्रतीक्षा कायम आहे. अद्यापही काही भागात पावसाची प्रतीक्षा कायम आहे.

आणखी वाचा :

Mukhyamantri Majhi Ladki Bahin : 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेसाठी पैशांची मागणी केल्यास कारवाई करा, सीएम एकनाथ शिंदे यांच्या सूचना 

 

Share this article