मुंबई आणि आसपासच्या भागात मुसळधार पाऊस सुरूच राहणार असून पालघर, मुंबई शहर-उपनगर, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांना मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा धोका आहे. पुणे जिल्ह्याच्या घाट भागाला ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. त्याचबरोबर नाशिकच्या घाट परिसरालाही यलो अलर्ट दिला गेला आहे. त्याउलट, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात जोरदार पावसाची शक्यता कमी असल्याने या भागांमध्ये सध्या कुठलाही अलर्ट जारी करण्यात आलेला नाही.