Maharashtra Weather Alert: राज्यात वादळी पावसाचं संकट!, १६ जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी

Published : Aug 11, 2025, 10:14 PM IST

Maharashtra Weather Alert: महाराष्ट्रात पुढील २४ तासांत काही भागांत ताशी ३० ते ४० किमी वेगाने वारे वाहण्याची आणि अनेक जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. 

PREV
17

मुंबई : राज्यात पुन्हा एकदा जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील २४ तासांमध्ये काही भागांमध्ये ताशी ३० ते ४० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे, तसेच अनेक जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याचा इशारा देण्यात आला आहे.

27

मुंबईसह कोकणात मेघगर्जनेसह पाऊस

मुंबई आणि उपनगरांमध्ये ढगाळ वातावरण राहणार असून, काही भागांत विजांसह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. कमाल तापमान ३२°C तर किमान तापमान २५°C च्या आसपास राहण्याचा अंदाज आहे.

पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्येही पावसाचा जोर राहण्याची शक्यता आहे. मुंबई वगळता इतर कोकणातील जिल्ह्यांना हवामान विभागाने यलो अलर्ट दिला आहे.

37

पश्चिम महाराष्ट्रातही पावसाचा इशारा

पुणे शहरात आकाश ढगाळ राहणार असून काही भागांत पावसाच्या सरींची शक्यता आहे. सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. सोलापूर आणि सांगली जिल्ह्यांमध्येही पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

47

उत्तर महाराष्ट्रात ढगाळ वातावरण, काही ठिकाणी पाऊस

नाशिक, धुळे, जळगाव, नगर आणि नंदुरबार या जिल्ह्यांत ढगाळ वातावरण राहील, आणि काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी पडू शकतात.

57

मराठवाड्यातील ८ जिल्ह्यांना यलो अलर्ट

मराठवाड्यात धाराशिव, लातूर, बीड आणि नांदेड या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली आणि परभणी या जिल्ह्यांमध्येही काही भागांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

67

विदर्भात वाऱ्यांसह मुसळधार पावसाचा इशारा

विदर्भातील यवतमाळ, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया या ६ जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. या भागांमध्ये वादळी वाऱ्यांसह जोरदार पाऊस पडू शकतो, असा हवामान विभागाचा अंदाज आहे.

77

सावध रहा! हवामान खात्याचा इशारा गंभीर

राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पुन्हा एकदा पावसाचा जोर जाणवण्याची शक्यता असल्याने शेतकरी, प्रवासी आणि नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे आहे. हवामान खात्याच्या ताज्या अद्यतनांवर लक्ष ठेवून योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे.

RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...
Read more Photos on

Recommended Stories