ओबीसी विरुद्ध मराठा?, शेंडगेंचा 288 जागा लढवण्याचा एल्गार!

Published : Aug 21, 2024, 04:43 PM ISTUpdated : Aug 21, 2024, 04:45 PM IST
Prakash shendge

सार

प्रकाश शेंडगे यांनी विधानसभेच्या सर्व 288 जागा लढवण्याचा निर्णय घेतल्याचे जाहीर केलाय. मराठा समाजाला ओबीसी आरक्षण नको असल्याची भूमिका कुणीही घेत नसल्याने आणि राज्यात ओबीसी विरुद्ध मराठा अशीच निवडणूक होणार असल्याने हा निर्णय घेतला आहे.

Prakash Shendge on Assembly Election: 57 लाख कुणबी दाखले घेऊन मराठा समाज ओबीसीमध्ये घुसला आहे, हे स्वतः मनोज जरांगे बोलत आहेत. तरी देखील सरकार काही बोलत नाही. म्हणून आता आम्ही विधानसभा निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. विधानसभेच्या सर्वच्या सर्व म्हणजे 288 जागा लढण्याचा आम्ही निर्णय घेतल्याची माहिती ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी दिली आहे. लोसंख्येच्या प्रमाणत तिकीट दिले जाईल असंही ते म्हणाले.

राज्यात ओबीसी विरुद्ध मराठा अशीच निवडणूक पार पडणार

मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण नको अशी भुमिका कुणीच घेते नाही. म्हणून आम्ही आता निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. कारण राज्यात ओबीसी विरुद्ध मराठा अशीच निवडणूक पार पडणार असल्याचे शेंडगे म्हणाले. लोकसभा निवडणुकीत प्रकाश आंबेडकर यांनी आमच्यासोबत प्रचारसभा घेतल्या आणि ऐन निवडणुकीत वेगळी भूमिका घेतली. कारण सुरुवातीला आम्हाला पाठिंबा दिला आणि ऐनवेळी धंनदांडग्यांना प्रकाश आंबेडकर यांनी पाठिंबा दिला. माझा पाठिंबा सांगलीत त्यांनी काढून घेतला आणि विशाल पाटलांना पाठिंबा दिला. दुसरीकडे बारामतीमध्ये सुप्रिया सुळे यांना पाठिंबा दिला. त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडी या नावात नेमकं कोण बसतं? हे त्यांनी स्पष्ट करावे असा टोलाही शेंडगेंनी लगावला आहे.

199 मतदारसंघात सर्व्हे पूर्ण झाले, प्रकाश शेंडगेंची माहिती

मनोज जरांगे पाटील जर उमेदवार उभे करणार असतील तर ओबीसी उमेदवारही उभा राहतील, आमचं बहुमत आहे असं वक्तव्य प्रशास शेंडगे यांनी काही दिवसापूर्नी केलं होतं. 60 टक्के जाती या ओबीसी आहेत. दलित आणि मुस्लिमांना सोबत घेतले तर आम्ही 80 टक्के जातो. आमचेही 199 मतदारसंघात सर्व्हे पूर्ण झाले असून आम्हीही तशीच भूमिका घेऊ शकतो असंही ते म्हणाले होते. आर्थिक मागास प्रवर्गातून 10 टक्के आरक्षण मिळत असून त्याचा लाभही मराठा समाजाला होत आहे. या मधील 10 टक्क्यांपैकी साडे आठ टक्के आरक्षण हे मराठा समाजातील विद्यार्थ्यांनी घेतले आहे असे प्रकाश शेंडगे म्हणाले होते. अशातच आता प्रकाश शेंडगे यांनी विधानसभेच्या 288 जागा लढवण्याचा एल्गार केला आहे. तसेच राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी अशीच लढत होणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे आगामी विधानसभेत रंगत निर्माण होण्याची शक्यता आहे.

आणखी वाचा : 

बदलापूर अत्याचार प्रकरणी संतापाची लाट, 24 ऑगस्टला महाराष्ट्र बंदची हाक

 

 

PREV
Maharashtra News (महाराष्ट्र बातम्या): Read Maharashtra LIVE Updates and Latest Marathi News Today. Check महाराष्ट्र राजकीय बातम्या, महाराष्ट्र क्राईम न्यूज, महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज. Watch Maharashtra Viral News Videos, Photos, Maharashtra Weather Updates in Marathi at Asianet Marathi News.
RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...

Recommended Stories

Pune Cab Dispute : पुण्यात आयटी तरुणीचा ३०० रुपये कॅब भाडं देण्यास नकार, ड्रायव्हरला दिली पोलिसांची धमकी
Wardha Doctor Slapped : पोलिसांसमोरच आरोपीने महिला डॉक्टरच्या कानशिलात लगावली, CCTV व्हिडिओ व्हायरल