Petrol Diesel Price: आज महाराष्ट्रातील इतर शहरांत पेट्रोल-डिझेलचा काय भाव आहे. आपण जाणून घेणार आहोत.
Petrol Diesel Price: खनिज तेलाच्या किंमतींमध्ये चढ उतार कायम आहे. काही देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर राहिले आहेत तर काही ठिकाणी किंचित वाढले आहेत. मुंबईत आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. पण, ठाणे आणि पुणे या शहरांत पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ झाली आहे. आज महाराष्ट्रातील इतर शहरांत पेट्रोल-डिझेलचा काय भाव आहे जाणून घेऊ या…
इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम या तेल विपणन कंपन्या देशात दररोज सकाळी पेट्रोल आणि डिझेलचे दर निश्चित करतात. हा दर जागतिक कच्या तेलाच्या किंमतीच्या आधारे केला जातो. या दरांमध्ये कर (व्हॅट), मालवाहतूक शुल्क, स्थानिक कर आदी विविध शुल्कांचा समावेश असतो. यानुसार प्रत्येक शहरांत पेट्रोल-डिझेलचे दर वेगवेगळे असतात.
शहर पेट्रोल (प्रति लिटर ) डिझेल (प्रति लिटर )
अहमदनगर १०३.८७ ९०.४२
अकोला १०४.०५ ९०.६२
अमरावती १०५.१० ९१.६३
औरंगाबाद १०५.१२ ९१.६२
भंडारा १०४.९३ ९१.४६
बीड १०४.४९ ९१.०२
बुलढाणा १०४.७३ ९१.२७
चंद्रपूर १०४.०४ ९०.६२
धुळे १०३.९४ ९०.४८
गडचिरोली १०४.८४ ९१.३८
गोंदिया १०५.४७ ९१.९८
हिंगोली १०४.९९ ९१.५१
जळगाव १०५.५६ ९२.०४
जालना १०५.७४ ९२.२१
कोल्हापूर १०४.४८ ९१.०२
लातूर १०५.२९ ९१.८०
मुंबई शहर १०४.२१ ९२.१५
नागपूर १०३.९६ ९०.५२
नांदेड १०५.८१ ९२.३१
नंदुरबार १०५.०० ९१.५१
नाशिक १०४.६८ ९१.१९
उस्मानाबाद १०५.२८ ९१.७९
पालघर १०४.८२ ९१.२९
परभणी १०७.३९ ९३.७९
पुणे १०४.०८ ९०.६१
रायगड १०३.८१ ९०.३२
रत्नागिरी १०५.५२ ९१.९६
सांगली १०४.४३ ९०.९८
सातारा १०४.९१ ९१.४१
सिंधुदुर्ग १०५.९२ ९२.४१
सोलापूर १०४.१२ ९०.६७
ठाणे १०४.३९ ९२.३३
वर्धा १०४.४९ ९१.०४
वाशिम १०४.५७ ९१.११
यवतमाळ १०४.८७ ९१.४०
गडचिरोलीमध्ये पेट्रोल १०४.८४ रुपये प्रति लिटर, हिंगोली शहरांत १०४.९९ रुपये प्रति लिटर, तर नागपूरात १०३.९६ रुपये प्रति लिटर, नांदेड १०५.८१ रुपये प्रति लिटर, परभणीमध्ये १०७.३९ रुपये प्रति लिटर तर पुण्यात १०४.०८ रुपये प्रति लिटर पेट्रोलची किंमत आहे. तर डिझेलची किंमत बीड ९१.०२ रुपये प्रति लिटर, चंद्रपूरमध्ये ९०.६२ रुपये प्रति लिटर, गोंदियामध्ये ९१.९८ तर जळगाव शहरांत ९२.०४ आणि कोल्हापुरात ९१.०२ रुपये प्रति लिटर, तर ठाणे शहरांत ९२.३३ रुपये प्रति लिटर डिझेलची किंमत असणार आहे.
सरकारी तेल कंपन्या दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोल आणि डिझेलचे दर अपडेट करतात. आज सकाळीही देशभरात पेट्रोल-डिझेलचे नवे दर अपडेट करण्यात आले आहेत. तर तुम्ही देखील घराबाहेर पडण्यापूर्वी किंवा एका शहरातून दुसऱ्या शहरात जात असाल तर गाडी स्टार्ट करण्यापूर्वी आजचे तुमच्या शहरातील पेट्रोल डिझेलचे दर पाहा आणि मगच प्रवासाला सुरुवात करा.
आणखी वाचा :
Dombivali Fire: डोंबिवलीतील एमआयडीसीमधील कंपनीला आग, स्फोटांच्या आवाजामुळे रहिवाशांमध्ये घबराट