Maharashtra Weather News : कोकणसह पश्चिम महाराष्ट्रात मंगळवारी पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर विदर्भातही मंगळवारी पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
Maharashtra Weather News : राज्याच्या विविध भागात पाऊस कोसळत असल्याचं चित्र दिसत आहे. कुठं जोरदार पाऊस पडतोय, तर कुठं हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडतोय. दरम्यान, मंगळवारीही राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मंगळवारी कोकणसह पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर विदर्भातही मंगळवारी पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. जाणून घेऊयात हवामानाच्या अंदाजाबद्दल सविस्तर माहिती.
'या' जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट
हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी कोकणात अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तिन्ही जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आले आहे. तर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा जिल्ह्यात देखील मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
'या' भागात पावसाचा यलो अलर्ट जारी
दरम्यान, मंगळवारी संपूर्ण विदर्भात देखील मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आज संपूर्ण विदर्भात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच मुंबईसह, ठाणे पालघर या जिल्ह्यांना देखील पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तसेच उत्तर महाराष्ट्रात देखील पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
आणखी वाचा :