मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी मुख्यमंत्र्यांनी पहिली स्वाक्षरी मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या फाईलवर केली.
मुंबई: गुरुवारी ५ डिसेंबर रोजी भाजपचे दिग्गज नेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे 21 वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी मुख्यमंत्र्यांनी पहिली स्वाक्षरी मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या फाईलवर केली.
पुणे येथील रुग्ण चंद्रकांत शंकर कुऱ्हाडे यांना पाच लाखाची मदत मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून देण्याचे निर्देश त्यांनी फाईलवर दिले आहेत. चंद्रकांत कुऱ्हाडे यांच्या पत्नीने बोन मॅरो ट्रान्सप्लांट उपचारासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून अर्थसहाय्य देण्याची विनंती केली होती, अशी माहिती मुख्यमंत्री वैद्यकीय सहायत्ता निधी कक्षाचे कक्षप्रमुख मुख्यमंत्री सचिवालयाचे विशेष कार्यकारी अधिकारी मंगेश चिवटे यांनी दिली.
फडणवीस अॅक्शन मोडमध्ये
देवेंद्र फडणीस मुख्यमंत्री झाल्यानंतर ते पहिल्याच बैठकीत अॅक्शन मोडमध्ये आले. मंत्रिमंडळाची बैठक झाल्यानंतर झालेल्या बैठकीचे निर्णय जाहीर करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेला उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे उपस्थित होते. नवीन सरकारची ही पहिलीच पत्रकार परिषद होती. यावेळी विधिमंडळ पत्रकार संघातर्फे देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचा सत्कारही करण्यात आला.
हेही वाचा-
महाराष्ट्रात ‘देवेंद्र’ पर्व : देवेंद्र फडणवीस यांनी घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ
देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा मुख्यमंत्री, एकनाथ शिंदे- अजित पवार उपमुख्यमंत्री