
Maharashtra Municipal Elections : राज्यातील तब्बल पाच ते सात वर्षांपासून प्रलंबित असलेल्या 29 महापालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम अखेर जाहीर झाला आहे. मुंबई, ठाणे, पुणे, नागपूरसह राज्यातील प्रमुख शहरांमध्ये 15 जानेवारी रोजी मतदान होणार असून, 16 जानेवारीला निकाल जाहीर केला जाणार आहे. या घोषणेसोबतच आजपासून आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. राज्य निवडणूक आयोगाने पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या निवडणुकांमध्ये एकूण 3 कोटी 48 लाख मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील महापालिका निवडणुका दीर्घकाळ रखडल्या होत्या. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला. त्यानंतर 2 डिसेंबर रोजी नगरपालिका व नगरपरिषदांच्या निवडणुका पार पडल्या आणि आता राज्यातील प्रलंबित 29 महापालिकांसाठी निवडणूक कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे.
मतदानाची तारीख : 15 जानेवारी
मतमोजणी व निकाल : 16 जानेवारी
यापैकी 27 महापालिकांची मुदत संपलेली असून, जालना आणि इचलकरंजी या दोन नव्या महापालिकांमध्ये प्रथमच निवडणुका होणार आहेत.
या निवडणुकांसाठी 1 जुलै 2025 ची मतदार यादी अंतिम मानण्यात येणार आहे. ही यादी केंद्रीय निवडणूक आयोगाकडून प्राप्त झाल्याने, त्यामध्ये बदल करण्याचा अधिकार राज्य निवडणूक आयोगाला नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
एकूण मतदार : 3.48 कोटी
एकूण मतदान केंद्रे : 39,147
मुंबईतील मतदान केंद्रे : 10,111
कंट्रोल युनिट्स : 11,349
बॅलेट युनिट्स : 22,000
मुंबई महापालिका : एक सदस्यीय वॉर्ड - मतदाराला एकच मत
उर्वरित 28 महापालिका : एक ते पाच सदस्यीय वॉर्ड - त्या प्रमाणात मतदान
उमेदवारी अर्ज फक्त ऑफलाईन पद्धतीने स्वीकारले जाणार
ज्यांच्याकडे जात वैधता प्रमाणपत्र नाही, त्यांनी निवडणुकीनंतर सहा महिन्यांच्या आत प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक
बृहन्मुंबई – 227
भिवंडी-निजामपूर – 90
नागपूर – 151
पुणे – 162
ठाणे – 131
अहमदनगर – 68
नाशिक – 122
पिंपरी-चिंचवड – 128
औरंगाबाद – 113
वसई-विरार – 115
कल्याण-डोंबिवली – 122
नवी मुंबई – 111
अकोला – 80
अमरावती – 87
लातूर – 70
नांदेड-वाघाळा – 81
मीरा-भाईंदर – 96
उल्हासनगर – 78
चंद्रपूर – 66
धुळे – 74
जळगाव – 75
मालेगाव – 84
कोल्हापूर – 92
सांगली-मिरज-कुपवाड – 78
सोलापूर – 113
इचलकरंजी – 76
जालना – 65
पनवेल – 78
परभणी – 65