दिल्लीत भावना गवळींनी PM मोदींना बांधली राखी, त्या काय म्हणाल्यात जाणून घ्या

Published : Aug 19, 2024, 01:42 PM ISTUpdated : Aug 19, 2024, 03:59 PM IST
mla bhavana gawali tied rakhi to prime minister modi

सार

रक्षाबंधनाच्या पवित्र सणानिमित्त, आमदार भावना गवळी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राखी बांधली. त्यांनी पंतप्रधान मोदींना देशातील कोट्यवधी बहिणींचे भाऊ म्हणून संबोधले.

वाशिम: आज (19 ऑगस्ट) रक्षाबंधन सण आहे. संपूर्ण महाराष्ट्रात हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. महाराष्ट्राच्या राजकारणातही अनेक भाऊ-बहीण आहेत. हेच भाऊ-बहीण रक्षाबंधन सणाला एकत्र येतात आणि आनंदात हा सण साजरा करतात. याच रक्षाबंधनाच्या सणाला आमदार भावना गवळी यांनी देखील देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राखी बांधली आहे.

काही दिसांपूर्वी पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत माजी खासदार भावना गवळी यांना तिकीट न मिळाल्याने त्यांना विधानपरिषदेच्या निवडणुकीत उमेदवार देण्यात आली होती. त्यात त्यांनी दणदणीत विजय मिळवला होता. त्यामुळे दोन दिवसापूर्वी भावना गवळी या दिल्ली येथे असताना दरवर्षीप्रमाणे यावर्षीही आमदार भावना गवळी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राखी बांधून रक्षाबंधनाचा हा पवित्र सण साजरा केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील कोट्यवधी बहिणींचे भाऊ

बहिण-भावाच्या नात्यातील ऋणानुबंधाचा गोडवा अधिक वृद्धिंगत व्हावा, याकरिता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दरवर्षीप्रमाणे यंदा रक्षाबंधनानिमित्त राखी बांधत मी रक्षाबंधन साजरा केला. मी भाऊ म्हणून मोदी यांना राखी बांधेतच, पण ते देशातील करोडो बहिणींचे देखील भाऊ आहेत. देशातील एवढ्या मोठ्या संख्येने असलेल्या महिलांबद्दल पहिल्यांदा विचार करणारे व्यक्तिमत्व हे नरेंद्र मोदी यांचे आहे. मोदी या महिलांचे भाऊ आणि पिता देखील आहेत. त्यांनी घेतलेल्या निर्णयांमुळे महिलांच्या जीवनात अनेक बदल झाले असल्याने ते आमचे भाऊ आहेत.

सुप्रिया सुळेंनी भास्कर भगरे यांना बांधली राखी

सुप्रिया सुळे काल (18 ऑगस्ट) नाशिक दौऱ्यावर आहेत. रात्री उशिरा त्या नाशिकमध्ये पोहोचल्या. नाशिकमध्ये पोहोचताच खासदार सुप्रिया सुळे यांनी दिंडोरीचे खासदार भास्कर भगरे यांना राखी बांधून रक्षाबंधन सण साजरा केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे दोन दिवसांपासून उत्तर महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. राखी पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला चांदवडमध्ये मेळावा झाला आहे. त्यानंतर खासदार भास्कर भगरे यांचे औक्षण करून सुप्रिया सुळे यांनी त्यांना राखी बांधली.

सुप्रिया सुळे-अजित पवार राजकीय विरोधक

पण सध्या महाराष्ट्राच्या राजकारणाची परिस्थिती बदलली आहे. अजित पवार यांनी बंड करून भाजपाशी हातमिळवणी केलेली आहे. सध्या अजित पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष सत्तेत आहे. तर खासदार शरद पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष विरोधी बाकावर बसलेला आहे. सुप्रिया सुळे या आपले वडील शरद पवार यांच्या पक्षात आहेत. म्हणजेच सध्या सुप्रिया सुळे आणि अजित पवार हे एकमेकांचे राजकीय विरोधक आहेत.

आणखी वाचा : 

Raksha Bandhan 2024 : ऑनलाइन पद्धतीने राखी खरेदी करताना या गोष्टींची घ्या काळजी

 

PREV
RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...

Recommended Stories

नववर्षात कोकण-गोवा ट्रिप प्लॅन केलीय? रेल्वेची मोठी घोषणा, या मार्गांवर धावणार खास गाड्या वेळापत्रक जाणून घ्या
तिकीट बुक करा! मराठवाड्यासाठी रेल्वेच्या ३ स्पेशल गाड्या सुरू; कुठून-कधी सुटणार? संपूर्ण माहिती एका क्लिकवर!