सणासुदीच्या काळात रेल्वे तिकीट कन्फर्म मिळवण्यासाठी 'हा' पर्याय वापरा

सणासुदीच्या काळात रेल्वेचे कन्फर्म तिकीट मिळवणे कठीण होऊ शकते. भारतीय रेल्वेची 'विकल्प' योजना ही एक उत्तम सुविधा आहे जी तुम्हाला कन्फर्म तिकीट मिळण्याची शक्यता वाढवू शकते.

Rameshwar Gavhane | Published : Aug 19, 2024 6:34 AM IST / Updated: Aug 19 2024, 01:07 PM IST

Railway Ticket Booking: राज्यात आता सणावारांचा सीजन सुरू झाला आहे आणि नोकरीच्या निमित्ताने किंवा दुसऱ्या गावी असणाऱ्यांना गावाकडे जाण्याच्या वेध लागले आहेत. गणेशोत्सवही आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. दरम्यान रेल्वेच तिकीट मिळणं फार अवघड होऊन बसल्याचे दिसून येते. अनेकदा रेल्वेचे कन्फर्म तिकीट मिळणे हे फार अवघड होऊन बसते. रेल्वे दरवर्षी अनेक सणासुदीच्या विशेष गाड्या चालवते. पण त्यालाही भरपूर गर्दी असल्याने वेटींग लिस्टमध्ये होणारी रांग वाढतच जाते. कन्फर्म तिकीट वाढण्यासाठी या काही सोप्या पर्यायांचा आपण वापर करू शकतो.

IRCTC पर्याय योजना

भारतीय रेल्वेने आपल्या प्रवाशांसाठी सहजपणे निश्चित जागा मिळवण्यासाठी 'विकल्प'चा पर्याय आणला आहे. ही एक अशी सुविधा आहे ज्याचा वापर करून तुम्ही तुमचे कन्फर्म तिकीट मिळण्याची शक्यता वाढवू शकता. हे फ्युचर कसं काम करतं आणि तुम्ही त्याचा कसा फायदा घेऊ शकता?

विकल्प योजना म्हणजे काय?

रेल्वेने 2015 मध्ये प्रवाशांसाठी विकल्प योजनेचा पर्याय सुरू केला होता. या योजनेत वेटिंग तिकीट ऑनलाइन बुक करताना प्रवाशांना कन्फर्म तिकीट मिळवण्यासाठी दुसऱ्या ट्रेनचा पर्याय देखील निवडता येतो. असे केल्याने त्यांचे तिकीट कन्फर्म मिळण्याची शक्यता वाढते. या योजनेला अल्टरनेट ट्रेन अकोमोडेशन स्कीम असेही म्हटले जाते. यासह रेल्वे अधिकारी प्रवाशांना कन्फर्म तिकीट प्रदान करते.

कन्फर्म तिकीट मिळवायचे कसे?

IRCTC तिकीट बुकिंग योजनेमुळे प्रवाशांना सणासुदीच्या काळात आणि इतर प्रसंगी कन्फर्म तिकीट मिळण्याची शक्यता वाढते. या विकल्प योजनेचा अर्थ असा नाही की, तुम्हाला कन्फर्म तिकीट मिळेलच. या योजनेअंतर्गत आपल्या प्रवाशांना कन्फर्म तिकिटे मिळावेत यासाठी हा पर्याय असून कन्फर्म तिकीट हे गाड्या आणि बर्थच्या उपलब्धतेवरच अवलंबून आहे.

विकल्प योजना कशी वापरायची?

IRCTC ची विकल्प योजना वापरण्यासाठी IRCTC वेबसाईट वरून तिकीट बुक करताना तुम्हाला तुमच्या ट्रेनमधील जागांची उपलब्धता तपासायला हवी. ट्रेनमध्ये सीट उपलब्ध नसल्यास ऑनलाईन ट्रेन तिकीट बुक करताना तुम्ही विकल्प निवडा.

यासाठी निवडता येतील सात ट्रेन

यानंतर IRCTC तुम्हाला तुमच्या आवडीच्या इतर ट्रेन बद्दल विचारते ज्यामध्ये तुम्ही सात ट्रेन निवडू शकता. तिकीट बुकिंग दरम्यान ऑप्शन उपलब्ध नसेल तर तुम्ही बुक केलेला तिकीट हिस्ट्रीमध्ये जाऊन तिकिटाचा पर्याय निवडू शकता. यानंतर भारतीय रेल्वे तुमच्या पसंतीच्या इतर ट्रेनमध्ये तुमच्यासाठी कन्फर्म तिकीट बुक करण्याचा प्रयत्न करेल.

आणखी वाचा : 

एकनाथ शिंदे यांचा गंभीर आरोप: 'मला अटक करण्याची होती योजना'

Share this article