
छत्रपती संभाजीनगर: अहमदनगरचे खासदार निलेश लंके यांनी संभाजीनगरमध्ये मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांची हॉस्पिटलमध्ये भेट घेतली आणि यावेळी त्यांनी तब्येतीची विचारपूस केली. मुख्यमंत्री आणि संबंधित मंत्र्यांना मी मनोज जरांगे पाटील यांच्या ज्या मागण्या आहेत त्यावर तोडगा निघाला पाहिजे अशी मागणी करणार आहे.
माझ्या मतदारसंघात जरांगे पाटील यांचा फायदा झाला : निलेश लंके
लोकसभेच्या निवडणुकीत मराठा आरक्षणाचा फायदा झाला का, यावर बोलताना निलेश लंके म्हणाले, माझ्या मतदारसंघात देखील जरांगे पाटील यांच्यामुळे फायदा झाला.
जरांगे यांचे उपोषण एक महिन्याकरता स्थगित
मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी आपलं आमरण उपोषण एक महिन्याकरता स्थगित केलं आहे. जरांगेंनी सरकारला 13 जुलैपर्यंत वेळ दिला आहे. एक महिन्यात सर्व मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर आपण स्वतः विधानसभेच्या रिंगणात उतरणार असा इशारा जरांगे यांनी दिला. राज्य सरकारचे मंत्री शंभूराज देसाई यांनी जरांगेंची समजूत काढली. आचारसंहितेमुळे दोन महिने काम ठप्प होतं, त्यामुळे सरकारला एक महिन्याचा वेळ द्या अशी विनंती जरांगेंनी केली. ही विनंती जरांगेंनी मान्य केली.